नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : रेल्वे अपघाताचे बरेच व्हि़डीओ तुम्ही पाहिले असतील. बहुतेक दुर्घटना या प्रवाशांचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारपणामुळेच घडतात. काही आपला जीव गमावून बसतात तर काहींच नशीब चांगलं म्हणून त्यांना वाचवण्यासाठी देवदूत धावत येतात. अशाच एका भयंकर दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोसल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man fell on metro track video). मेट्रो ट्रॅकवर कोसळलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सीआईएसएफ आपल्या जीवाची बाजी लावली (CISF Jawan saved life of man at metro railway station) . मेट्रो स्टेशनवरील दुर्घटनेचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला. स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मोबाईलमध्ये व्यस्त आहे. मोबाईलमध्ये पाहता पाहता ती मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर चालत आहे. मोबाईलमध्ये ती इतकी गुंतली आहे की समोर काय आहे, आपण कुठे चालत आहोत याचं भानही या व्यक्तीला नाही. चालता चालता ही व्यक्ती धाकडन मेट्रोच्या ट्रॅकवरच कोसळते. त्यानंतर त्या व्यक्तीला उठायलाही जमत नाही. ज्या प्लॅटफॉर्मवरून ही व्यक्ती कोसळते त्या प्लॅफॉर्मवर काही अंतरावर प्रवाशी आहेत. पण कुणीच त्याच्या मदतीला येत नाही. विरुद्ध दिशेच्या प्लॅटफॉर्मला काही सीआयएसएफचे जवान आहेत. त्यांची नजर त्याच्यावर पडते. त्यापैकी एक जवान क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातो. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतो. हे वाचा - बापरे! Back flip मारताच जमिनीवर धाडकन आदळलं डोकं आणि…; VIDEO पाहूनच घाबरले लोक उशीर व्हायला नको म्हणून तोसुद्धा थेट ट्रॅकवरच उतरतो. एका ट्रॅकवरून विरुद्ध दिशेच्या ट्रॅकवर जिथं ती व्यक्ती पडली आहे तिथं जातो. त्या व्यक्तीला कसंबसं उचलतो आणि प्लॅटफॉर्मजवळ नेत आधी त्याला प्लॅटफॉर्मवर चढवतो. त्यानंतर तो स्वतः चढतो.
थोडा जरी उशीर झाला असता तर या व्यक्तीला मेट्रोने चिरडलं असतं. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या जवानाचा जीवही तसा धोक्यातच होता. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. हे वाचा - Video :दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक,34 मृत्यू CISF च्या अधिककृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीतील शाहदरा मेट्रो स्टेशनवरील आहे. प्रवाशासाठी देवदूत बनून आलेला या जवानाचं ना शैलेंद्र मेहता आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर या जवानाचं कौतुक होतं आहे. सर्वांनी त्याला सॅल्युट केलं आहे.