मुंबई, 05 फेब्रुवारी : वयाचं तिसरं वर्षे… ज्या वयात मुलं कुठे नीट आपल्या पायावर चालू लागलेली असतात तरी काही मुलांना नीट आपला तोल सावरता येत नसतो. चालता चालता ते धाडकन पडतातही. मुलं बोलतात पण त्यांचे बोल बोबडेच असतात. त्यांना तुम्ही जर काही शिकवलं तर कसंबसं करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणावं तसं तितकं ते परफेक्ट नसतं पण ते त्यांच्या वयाच्या मानाने खूपच भारी आणि क्युट असतं. पण याच वयाच्या एका मुलाने मात्र असं करतब करून दाखवलं आहे. जे पाहून तुमच्या तोंडातून सो क्युटसोबतच ओ माय गॉड असे उद्गार बाहेर पडतील (3 year old child skating video). 3 वर्षांच्या चिमुकल्याने असं काही केलं आहे, जे पाहून तरुणानांही लाज वाटेल, त्यांना घाम फुटेल. व्हिडीओ पाहून ते तोंडातच बोटं घालतील. आता ज्याचं आम्ही इतकं कौतुक करत आहोत त्याने असं नेमकं केलं तरी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. व्हिडीओत पाहू शकता एक छोटासा चिमुकला हातात स्केटबोर्ड घेऊन आहे. स्केटबोर्ड तो आधी एका उंच भिंतीवर फेकतो. त्यानंतर त्या भिंतीवर तो चढण्याचा प्रयत्न करतो. कसंबसं करून तो त्या भिंतीवर चढतो. या स्केटबोर्डसह या वयाचा मुलगा काय करेल, तर त्याला चाकं म्हणून तो हातात घेऊन खेळण्यातील गाडी चालवावी तसं चालवेल. पण या मुलाने जे केलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. किंबहुना तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. हे वाचा - बापासाठी लेकीची तळमळ! या पोरीमुळे सोशल मीडियावर आसवांचा पूर; एकदा हा VIDEO पाहाच उंचावर चढल्यानंतर तो स्केटबोर्ड आपल्या पायाखाली घेतो आणि घसरत खाली येत अगदी समोरच्या दिशेने वेगाने जातो. तसाच पुन्हा मागे येतो आणि पुन्हा जातो. अगदी बिनधास्त आणि मजेशीर अंदाजात तो स्केटिंग करताना दिसतो.
स्केटिंग म्हणजे लहान मुलांचा खेळ नाही. अगदी मोठ्या माणसांनाही सहजपणे ते जमत नाही. पण तरी मेहनत, योग्य प्रशिक्षण घेऊन काही लहान मुलांना तुम्ही स्केटिंग करताना पाहिलं असेल. पण 3 वर्षे इतक्या कमी वयाचं मूल क्वचितच पाहिलं असावं. कारण ज्या वयात नीट चालता, पळता येत नाही, त्या वयात स्केटिंग तर दूरचीच गोष्ट आहे. पण हा चिमुकला मात्र त्याला अपवाद ठरला आहे. हे वाचा - बापरे! Back flip मारताच जमिनीवर धाडकन आदळलं डोकं आणि…; VIDEO पाहूनच घाबरले लोक अवघ्या तिसऱ्या वयातच त्याने अगदी परफेक्ट स्केटिंग करून दाखवलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. किंबहुना जेव्हा तो स्केटिंग करू लागला तेव्हा पाहून तिथं उपस्थित असलेले तरुणही थक्क झाले. एका कोपऱ्यात शांत उभे राहून त्यालाच ते पाहत राहिले. @buitengebieden_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या चिमुकल्याला एका युझरने अद्भुत असं म्हटलं आहे.