जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एअरलाईन्सच्या एका चुकीने महिलेला थेट परदेशात पोहोचवलं; विमानतळावर उतरताच बसला धक्का

एअरलाईन्सच्या एका चुकीने महिलेला थेट परदेशात पोहोचवलं; विमानतळावर उतरताच बसला धक्का

फाईल फोटो

फाईल फोटो

एक महिला व्हिसा-पासपोर्टशिवाय परदेशात पोहोचली. विमानतळावर उतरल्यावर ती थक्क झाली. पण हे कसं घडलं? आणि महिलेसोबत नेमकं काय झालं?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 मे : परदेशात जायचं असेल तर बरीच कामं आधी करावी लागतात. यासाठी पासपोर्ट तर आवश्यकच आहे, कारण त्याशिवाय तिथे प्रवेश नाही. तुम्हाला व्हिसा घ्यावा लागेलच. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही देशात एक मिनिटही राहिलात तर तुम्हाला बेकायदेशीर म्हटलं जाईल. या सगळ्याची अनेक दिवस तयारी करावी लागते. पण एक महिला व्हिसा-पासपोर्टशिवाय परदेशात पोहोचली. विमानतळावर उतरल्यावर ती थक्क झाली. पण हे कसं घडलं? आणि महिलेसोबत नेमकं काय झालं? जाणून घेऊया. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, न्यू जर्सी येथे राहणाऱ्या बेवर्ली एलिस-हेबर्डला फ्लोरिडाला जायचं होतं. ती बर्‍याचदा फिलाडेल्फियापासून जॅक्सनव्हिलमधील तिच्या दुसऱ्या घरी जाते. ती प्रत्येक वेळी फ्रंटियर फ्लाइट निवडते. पण यावेळी विमानतळावर पोहोचल्यावर ती एका गेटच्या आत शिरली, ज्यावर लिहिलं होतं - PHL टू JAX. ती निघणार होती, तेव्हा तिला वाटलं की त्याआधी टॉयलेटला जाऊन यावं. गेट एजंटला विचारल्यावर तो म्हणाला - काही हरकत नाही. पैसे जमवून नवं घर खरेदी केलं; आत प्रवेश करताच ओरडत बाहेर पळाली महिला, दिसलं भयानक दृश्य एलिस परत आली तेव्हा विमान भरलं होतं आणि टेक ऑफ करणार होतं. ती पटकन गेटपाशी पोहोचली. एलिसने सांगितलं, की गेट एजंटने बोर्डिंग पास दाखवण्यास सांगितलं. मग त्याने विचारलं - तू बेवर्ली एलिस-हेबर्ड आहेस का? मी होकारार्थी मान हलवली. मी म्हणाले, तुमच्याकडे माझा बोर्डिंग पास आहे. मी आत्ताच चेक इन केलं होतं. तो म्हणाला हो, ठीक आहे जा. विमान हवेत असताना क्रूचा एक सदस्य आला आणि सांगितलं, तुमचं गेट बदललं होतं, यामुळे तुम्ही चुकीच्या विमानात आला आहात. हे विमान फ्लोरिडाला नाही तर जमैकाला जाणार आहे. महिलेला वाटलं की क्रू मेंबर मस्करी करत आहे. ती हसली आणि मग म्हणाली, मला तिथे जायला आवडेल. कारण तिथे एक सुंदर समुद्रकिनारा आहे. मी तिथेच राहते. तेव्हा फ्लाईट अटेंडंट गंभीरपणे म्हणाली, मॅडम हे विमान जमैकाला जात आहे. तुम्ही माझं लक्षपूर्वक ऐका. एलिस म्हणाली - तेव्हा मला वाटलं की ती खरं बोलत आहे. विमानतळावर उतरताच विमानातील कर्मचाऱ्यांनी तिला अडवलं आणि म्हणाले की - दुसरं विमान मिळेपर्यंत तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. फिलाडेल्फियाला उड्डाण मिळेपर्यंत फ्लाइट क्रू मेंबर अनेक तास तिच्यासोबत राहिला. फ्रंटियर एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “प्रवाशाची चुकीच्या फ्लाइटमध्ये बदली झाल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही त्यांना परतावा आणि नुकसानभरपाई दिली आहे. तसेच विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत या प्रकरणाबाबत बोलणं झालं आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात