महिलेनं सांगितलं की, जेव्हा मी माझं नवीन घर बुक केलं तेव्हा मला कल्पनाही नव्हती की घरात इतके साप असतील. त्याच्या गॅरेजच्या मागील दाराचा संदर्भ देत महिला म्हणाली, "माझ्या कुत्र्याला काहीतरी दिसलं, तेव्हा मी माझं सामान उघडण्याचा प्रयत्न करत होते." (प्रतिकात्मक फोटो)
तो काय पाहतोय हे पाहण्यासाठी मी बाहेर आले. मला वाटलं, कदाचित इथे कोळी किंवा असं काहीतरी असेल. पण तिथे दोन छिद्रे होती. त्यातून साप बाहेर पडताना आणि भिंतींवर फिरताना मी पाहिले. मी ओरडत बाहेर आले. मी खूप घाबरले होते.
महिला म्हणाली, दाराला एक तडा होता, त्यातही अनेक साप होते. त्यावेळी मी सर्व काही साफ करून घेतले. मात्र तेव्हापासून तिथे सतत साप दिसत आहेत. आतापर्यंत 10 दिवसांत 10 हून अधिक साप दिसले आहेत.
जाणकार हे गार्टर साप आहेत, असं सांगत आहेत, पण एवढे मोठे गार्टर साप त्यांनी पाहिलेले नाहीत, असंही ते म्हणाले. ती स्त्री म्हणाली, मला मृत्यूची भीती वाटते. मी तिथे जाऊ शकत नाही.
या सापांना बाहेर काढण्यासाठी महिलेने एका स्नेक रँगलरला कामावर ठेवलं असून आतापर्यंत तिने सुमारे एक हजार डॉलर्स खर्च केले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, घराच्या खाली कदाचित एक छिद्र आहे, ज्यामध्ये साप राहतात. ते इथे दोन वर्षांपासून असू शकतात. म्हणूनच ते पूर्णपणे साफ होईपर्यंत ते दिसतच राहतील.