जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण; ऐन लग्नमंडपातून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण; ऐन लग्नमंडपातून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण; ऐन लग्नमंडपातून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं

या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव लग्नातील परंपरेनुसार केले जाणारे काही विधी (Wedding Rituals) करण्यासाठी खाली बसलेले आहेत. इतक्यात दोघांमध्ये काहीतरी वाद होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Video) होत राहतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही, तर काही व्हिडिओ विचार कऱण्यास भाग पाडणारे असतात. काही व्हिडिओ पाहून थिरकण्याची इच्छा होते तर काही व्हिडिओ भावुक करून जातात. सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील असाच व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. यात नवरीबाई अचानकच मंडपातून उठून जाताना दिसते. अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; मजेशीर VIDEO सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram Reels) नवरी आणि नवरदेवाचा लग्नातील हा व्हिडिओ व्हायरल (Video of Bride and Groom) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव लग्नातील परंपरेनुसार केले जाणारे काही विधी (Wedding Rituals) करण्यासाठी खाली बसलेले आहेत. इतक्यात दोघांमध्ये काहीतरी वाद होतो. पांढऱ्या रंगाची साडी घातलेली ही नवरी अचानक नवरदेवापासून उठते आणि तिथून निघीन जाते. नवरीचं हे कृत्य पाहून आसपास बसलेले नातेवाईकही हैराण होतात.

जाहिरात

बोल्ड ड्रेस घालून आजोबांच्या अंत्यसंस्काराला पोहोचली तरुणी; पोस्टची रंगली चर्चा आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे, नवरी अशा प्रकारे मंडपातून उठून जाते मात्र तरीही कोणीही तिला थांबवत नाही. नवरी स्टेजवरुन उतरून काही अंतर पुढे जाते आणि नंतर स्वतःच माघारीही येते. नवरीला मंडपाकडे परत जाताना पाहून पाहुणे तिच्या या नाटकीपणावर हसतातही. या व्हिडिओमध्ये दिसतं, की मंडपापासून काही अंतरावरच एक मुलगा आहे, जो नवरीचा हा ड्रामा पाहून डोकं पकडून हसू लागतो. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात