मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डायटिंग न करता फक्त FB आणि Instagram डिलीट करून महिलेनं घटवलं 31 किलो वजन; वाचा कसं झालं शक्य

डायटिंग न करता फक्त FB आणि Instagram डिलीट करून महिलेनं घटवलं 31 किलो वजन; वाचा कसं झालं शक्य

ब्रेंडाला गेल्या अनेक दिवसांपासून वजन कमी करायचं होतं. प्रत्येक प्रकारचं डायट आणि विविध उपाय करूनही तिचं वजन कमी होत नव्हतं

ब्रेंडाला गेल्या अनेक दिवसांपासून वजन कमी करायचं होतं. प्रत्येक प्रकारचं डायट आणि विविध उपाय करूनही तिचं वजन कमी होत नव्हतं

ब्रेंडाला गेल्या अनेक दिवसांपासून वजन कमी करायचं होतं. प्रत्येक प्रकारचं डायट आणि विविध उपाय करूनही तिचं वजन कमी होत नव्हतं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : आजकालच्या काळात लोक भरपूर सोशल झाले आहेत. इथे सोशलचा अर्थ असा नाही की लोक बाहेर जाऊन दुसऱ्यांना भेटत आहेत. तर, आजकालच्या काळात लोक आपल्या मोबाईलवरुन सोशल मीडियावर भरपूर सक्रीय (Active on Social Media) राहात आहेत. लोक आपला बहुतेक वेळ याच प्लॅटफॉर्मवर घालवतात. मनोरंजन आणि टाईमपाससाठी असलेल्या या प्लॅटफॉर्मच लोक आजकाल आपला जास्त वेळ घालवतात. मात्र, नॉर्थ लंडनमध्ये राहणाऱ्या ब्रेंडानं आपलं सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केलं आणि त्यातून वाचलेला वेळ आपल्या फिटनेस रुटीनमध्ये दिला (Weight Loose after Deleting Social Media Account). यामुळे तिने केवळ एका वर्षात ३१ किलोहून अधिक वजन घटवलं (31 kg Weight Loss in 1 Year) .

ब्रेंडाला गेल्या अनेक दिवसांपासून वजन कमी करायचं होतं. प्रत्येक प्रकारचं डायट आणि विविध उपाय करूनही तिचं वजन कमी होत नव्हतं. मात्र, आता तिने दावा केला आहे, की आपल्या फोनमधून इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे दोन अॅप डिलीट केल्याने तिने वर्षभरात 31 किलो वजन कमी केलं आहे. ब्रेंडाच्या म्हणण्यानुसार, 2016 ते 2019 या काळात हलगर्जीपणामुळे तिचं वजन खूप जास्त वाढलं.

डुकराचं शरीर अन् गाईची 2 तोंडं; शेतकऱ्याच्या घरी अजब बछड्याने घेतला जन्म, Photo

मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात तर तिचं वजन फारच वाढलं. या सगळ्यासाठी सोशल मीडियाच जबाबदार असल्याचं तिनं सांगितलं. तिनं सांगितलं, की ऑनलाईन तिला हेल्दी राहण्यासाठीच्या टिप्स आणि वेगवेगळ्या पद्धती दिसत असत. ते पाहून ती अजूनच डिप्रेस राहात असे. यामुळे तिने आपले सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले.

ब्रेंडानं सांगितलं, की तिनं आपलं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करताच काहीच काळात आपले कपडे लूज होत असल्याचं तिला जाणवलं. तिचं वजन कमी होऊ लागलं होतं. केवळ एकाच वर्षात तिनं भरपूर वजन कमी केलं. तिला असं वाटतं की ती सोशल मीडियापासून दूर राहिली नसती तर हे शक्य नव्हतं. ती आपला वेळ सोशल मीडियावर घालवण्याऐवजी जॉगिंगसाठी जाते. याशिवाय ती आपला बहुतेक वेळ कुकींगमध्ये घालवते. या वेळेत ती हेल्दी पदार्थ बनवते.

मोठ्या दिमाखात स्टंट करायला गेला अन् तोंडावर आपटला; हा VIDEO पाहून नेटकरी लोटपोट

आता अतिशय स्लिम झालेल्या ब्रेंडाने सांगितलं, की बऱ्याच काळापासून ती आपल्या जाडीमुळे हैराण होती. तिने भरपूर प्रयत्न केले मात्र तरीही तिचं वजन कमी होत नव्हतं. तिच्या डायटमध्ये अधिक जंक फूड असे. यात अनेक चिप्सचे पॅकेटही असत. तिला आपले फोटो पाहाणंही आवडत नसे. व्यायाम करूनही तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. सोशल मीडिया आणि स्लिम मुलींना पाहून तिला वाईट वाटत असे. यासाठी तिने सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले. यानंतर एकाच वर्षात तिचं ३१ किलो वजन कमी झालं.

First published:

Tags: Viral news, Weight loss