जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मोठ्या दिमाखात स्टंट करायला गेला अन् तोंडावर आपटला; तरुणाचा हा VIDEO पाहून नेटकरी लोटपोट

मोठ्या दिमाखात स्टंट करायला गेला अन् तोंडावर आपटला; तरुणाचा हा VIDEO पाहून नेटकरी लोटपोट

मोठ्या दिमाखात स्टंट करायला गेला अन् तोंडावर आपटला; तरुणाचा हा VIDEO पाहून नेटकरी लोटपोट

व्हिडिओमध्ये एक मुलगा काहीतरी करत असल्याचं दिसतं, त्याचा हा व्हिडिओ पाहून हसू आवरणं कठीण होतं. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. यातील अनेक व्हिडिओ हैराण करणारे असतात तर अनेक व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल (Instagram Reels Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. लग्नातील मस्ती नवरीबाईला पडली भारी, नवरदेवही वाचवूू शकला नाही; VIDEO VIRAL व्हिडिओमध्ये एक मुलगा काहीतरी करत असल्याचं दिसतं, त्याचा हा व्हिडिओ पाहून हसू आवरणं कठीण होतं. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

जाहिरात

एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, या मुलाला कोणीच हसणार नाही, हे त्याचं वॉर्म अप सुरू आहे. दुसऱ्या यूजरनं लिहिलं, ‘मालक तुम्हीच इथेच राहा, आम्ही निघतो. दुआ में याद रखना’. आणखी एकाने यावर कमेंट करत लिहिलं, भाऊ आज अंडरटेकरलाही सोडणार नाही. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्रा सांगतो भविष्य, सोशल मीडियावर झालाय स्टार; पाहा VIDEO व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पॅन्ट घातलेला हा व्यक्ती घरात अशाप्रकारे फिरत असतो, जणू तो बाहुबलीच आहे. काही वेळानंतर तो वॉर्म अप करण्यास सुरुवात करतो. पाहता पाहता तो शीर्षासन करू लागतो. मात्र, त्याने खाटेवर आपली मान ठेवताच त्याचं डोकं खालच्या बाजूने बाहेर निघतं आणि तो थेट जमिनीवर येतो. हे पाहताच घरात उपस्थित इतर सदस्य लगेचच त्याच्या मदतीसाठी धावतात आणि या खाटेमध्ये अडकलेली त्याची मान बाहेर काढतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात