मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डुकराचं शरीर अन् गाईची 2 तोंडं; शेतकऱ्याच्या घरी अजब बछड्याने घेतला जन्म, Photo Viral

डुकराचं शरीर अन् गाईची 2 तोंडं; शेतकऱ्याच्या घरी अजब बछड्याने घेतला जन्म, Photo Viral

कृत्रिम इनसेमिनेशनद्वारे (Artificial Insemination) या बछड्याची गर्भधारणा झाली. वासराला दोन डोकी होती. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे शरीर.

कृत्रिम इनसेमिनेशनद्वारे (Artificial Insemination) या बछड्याची गर्भधारणा झाली. वासराला दोन डोकी होती. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे शरीर.

कृत्रिम इनसेमिनेशनद्वारे (Artificial Insemination) या बछड्याची गर्भधारणा झाली. वासराला दोन डोकी होती. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे शरीर.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : जगात अनेकदा काहीतरी विचित्र किंवा वेगळे प्राणी जन्म घेतात. आईच्या गर्भातूनच ते एक वेगळंच रूप घेऊन येतात. यामागे अनेक कारणं असतात. मात्र, अशा बहुतेक प्रकरणांमध्ये लोक याला चमत्कार किंवा देवाचा अवतार असल्याचं सांगून पुजा करतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या रशियातील अशाच एका गाईच्या बछड्याचे फोटो व्हायरल (Viral Photos of Weird Calf) होत आहेत. कृत्रिम इनसेमिनेशनद्वारे (Artificial Insemination) या बछड्याची गर्भधारणा झाली. वासराला दोन डोकी होती. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे शरीर. या वासराचे शरीर डुकरासारखे होते (Calf With Pig Body).

कुत्रा सांगतो भविष्य, सोशल मीडियावर झालाय स्टार; पाहा VIDEO

या विकृत वासराच्या जन्माने शेतकरी आश्चर्यचकित झाला. वासराला पाहताच तो ओरडला. या वासराचे तोंड गायीसारखे होते परंतु त्याचे शरीर डुकरासारखे होते. ज्यांनी ते पाहिले त्यांना हे बछडे डुकरासारखे वाटले. मृत वासराचा जन्म गर्भातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर बछड्याला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी त्याची आईही मरण पावली. या वासरावर सध्या अभ्यास केला जात आहे.

या विकृत बछड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बछड्याचा गुलाबी निर्जीव मृतदेह पडलेला दिसला. त्याचे पाय फक्त जमिनीवर पसरले होते. यासोबतच दोन्ही तोंडातून जीभ बाहेर आलेली होती. त्याचे डोळेही विचित्रपणे विस्तीर्ण दिसत होते. सर्वात विचित्र वासराचे शरीर होते, जे डुकरासारखे होते. या बछड्याला वाचवता आले नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्याचवेळी बछड्याला जन्म दिल्यानंतर काही वेळातच गायही मरण पावली. हे वासरू गायीचे पहिले अपत्य होते.

प्राणीसंग्रहालयात व्यक्तीनं 11 वाघांसमोर घेतली उडी अन्...; धडकी भरवणारा VIDEO

या प्रकरणाबाबत 25 ऑक्टोबर रोजी कृषी आणि अन्न मंत्रालयाच्या पशुवैद्यकीय औषध विभागाने सांगितले की, हे प्रकरण गावातील एका शेतकऱ्याच्या घरचे आहे. वासरू जन्मताच मृत झाल्याची माहिती स्वतः शेतकऱ्याने दिली होती. अनुवांशिक विकारांमुळे अशी प्रकरणे येतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवामान आणि आईच्या जीन्सचाही यात महत्त्वाचा वाटा आहे. तसेच, काहीवेळा असे मूल क्रॉस ब्रीडिंगमुळे जन्माला येते. सध्या या बछड्याचा फोटो व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Viral photos