नवी दिल्ली 12 जून : तुम्ही कधी माणसांना प्राण्यांशी बोलताना ऐकलं आहे का? हा प्रश्न वाचून सगळ्यात आधी तुम्हाला वाटेल की हे खरंच घडतं का? मनुष्य प्राण्याशी कसं बोलू शकतो? पण, जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांची वैशिष्ट्ये इतरांपेक्षा खूप वेगळी आहेत. ज्यामुळे ते आपली ओळख निर्माण करतात. काही लोक त्यांच्या हुशारी आणि नजरेसाठी जगात ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात महिला; पाण्याला हातही लावू शकत नाहीत, अजब परंपरा जाणून व्हाल थक्क अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या या महिलेचं नाव निक्की वास्कोनेझ आहे. या महिलेकडे असलेल्या खास वैशिष्ट्यामुळे तिने अतिशय वेगळ्या क्षेत्रात करिअर केलं आहे. निक्की व्हॅस्कोनेझ नावाची महिला केवळ प्राण्यांशी बोलत नाही तर त्यांच्या मनातील गोष्टीही समजून घेते. अशी अद्वितीय वैशिष्ट्ये असलेल्या लोकांना प्रोफेशनल प्राणी व्हिस्परर्स (Animal Whisperer) म्हणतात. अमेरिकेत राहणाऱ्या निक्कीने कुत्र्या-मांजरांच्या मनातील गोष्टी सहज समजून घेत आपल्या या कौशल्याने आपलं करिअर घडवलं आहे (Unique Business). अमेरिकन मीडिया डेली स्टारच्या मते, 33 वर्षीय निक्कीने यापूर्वी प्रॉपर्टी लॉयर म्हणून पूर्णवेळ काम केलं. जिथे तिचं वार्षिक सॅलरी पॅकेज 58 लाख रुपये होतं. पण, तिच्या नोकरीच्या काळातच निकीने प्राण्यांच्या मानसशास्त्राबद्दल वाचायला सुरुवात केली. त्यानंतर तिला हे काम खूप आवडू लागलं. यानंतर, तिने वकिलाची नोकरी सोडली आणि स्वतःचं थेरपी क्लिनिक उघडून एक व्यावसायिक थेरपिस्ट बनली. आता ती प्राण्यांसोबत गप्पा मारून 60 लाख रूपये कमवते. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने पालटलं महिलेचं नशीब; काही तासातच झाली 19 कोटींची मालकीण डेली स्टारच्या वृत्तानुसार, निक्कीने सप्टेंबर 2020 मध्ये व्यावसायिक थेरपिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ज्याच्या प्रमोशनसाठी तिने सोशल मीडियाची मदत घेतली. ज्याचा तिला खूप फायदाही झाला. निक्की म्हणाली की ती तिच्या नवीन आणि सर्वात अनोख्या व्यवसायामुळे खूप आनंदी आहे. निक्कीने पुढे सांगितलं की, तिच्या जुन्या कामात तिला तासनतास काम करावं लागत असे. पण आता ती खूप खुश आहे. रिपोर्ट्सनुसार, निक्की एका सेशनसाठी जवळपास 27 हजार रुपये चार्ज करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.