Home /News /viral /

अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने पालटलं महिलेचं नशीब; काही तासातच झाली 19 कोटींची मालकीण

अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने पालटलं महिलेचं नशीब; काही तासातच झाली 19 कोटींची मालकीण

54 वर्षीय महिलेला एका अनोळखी पुरुषाने लॉटरीचं तिकीट विकत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर विश्वासाने महिलेनं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. या व्यक्तीच्या सल्ल्याबरोबरच महिलेला नशिबाचीही साथ मिळाली

    नवी दिल्ली 10 जून : जवळपास दररोज कोणीतरी आपल्याला काही ना काही सल्ले देत असतं. ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. मात्र आता एका अज्ञात व्यक्तीच्या सल्ल्याने महिलेचं नशीब पालटलं आणि ती करोडोंची मालकीण बनल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने महिलेला लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा सल्ला दिला होता, ज्याचा महिलेला खूप फायदा झाला (Woman Wins 31 Crore Lottery). जाड कंबर.. भरा टॅक्स, सावली पडली.. भरा टॅक्स; कशावरही टॅक्स लावणारे चित्रविचित्र देश 54 वर्षीय महिलेला एका अनोळखी पुरुषाने लॉटरीचं तिकीट विकत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर विश्वासाने महिलेनं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. या व्यक्तीच्या सल्ल्याबरोबरच महिलेला नशिबाचीही साथ मिळाली आणि ती लॉटरी जिंकून (Lottery Winner) करोडोंची मालकीण बनली. ही महिला अमेरिकेतील जेनेसी काउंटीची रहिवासी आहे. गोपनियतेमुळे महिलेचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या पतीसोबत गॅस स्टेशनवर लाइनमध्ये होती. मग एक व्यक्ती तिच्याकडे आला आणि म्हणाला, 'तुम्ही 2300 रुपयांना ($30) लॉटरीचं तिकीट घ्या.' या व्यक्तीने दावा केला की ती 31 कोटी जिंकू शकते. 40 वर्षांपूर्वी हरवला होता कासव, इतक्या वर्षानंतर समोर आलं धक्कादायक चित्र काही वेळ विचारविनिमय केल्यानंतर महिलेनं तिकीट घेतलं. यानंतर या जोडप्याने कारमधून उतरताच ते तिकीट स्क्रॅच केलं. जोडप्याने पाहिलं की त्या व्यक्तीने जेवढा दावा केला होता तेवढीच रक्कम त्यांनी जिंकली. अशा प्रकारे ती महिला अनपेक्षितपणे करोडपती झाली. याची तिने कल्पनाही केली नव्हती. यानंतर ती लॉटरी हेडक्‍वार्टरमध्ये पोहोचली. तिने एकाचवेळी 19 कोटी रुपये घेण्याचं ठरवलं. महिलेकडे बक्षीस म्हणून 31 कोटी रुपये घेण्याचा पर्यायही होता. मात्र या पूर्ण रकमेसाठी तिला 30 वर्षे वाट पाहावी लागली असती, ही रक्कम दरवर्षी हप्त्यांमध्ये मिळाली असती. या कारणास्तव तिने 19 कोटी रुपये एकरकमी घेण्याचं ठरवलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Lottery, Viral news

    पुढील बातम्या