मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात महिला; पाण्याला हातही लावू शकत नाहीत, अजब परंपरा जाणून व्हाल थक्क

आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात महिला; पाण्याला हातही लावू शकत नाहीत, अजब परंपरा जाणून व्हाल थक्क

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या जमातीच्या महिला आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात, तीही त्यांच्या लग्नाच्या दिवशी (Himba Women Bath only Once in Life). याशिवाय तिला पाण्याचा वापर करून कपडेही धुता येत नाहीत

    नवी दिल्ली 11 जून : जगात अशा अनेक विचित्र जमाती आहेत ज्यांच्या श्रद्धा इतरांना आश्चर्यचकित करतात. या समजुती वर्षानुवर्षे जुन्या आहेत. आधुनिकतेमुळे शहरी लोक आपल्या परंपरा आणि चालीरीती विसरले आहेत, मात्र आजही आदिवासी लोक त्यांचं पालन करतात. आफ्रिकेत राहणारी एक जमात अजूनही आपल्या काही परंपरांवर विश्वास ठेवते, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल (African tribes weird tradition). नामिबियामध्ये राहणारी हिम्बा जमात अतिशय अनोखी आहे. कारण इथल्या लोकांमध्ये मुलाच्या जन्माबाबत खूप रंजक परंपरा आहे. इतर ठिकाणांप्रमाणे या जमातीतील मूल या जगात जन्माला येतं तेव्हा त्याची जन्मतारीख विचारात घेतली जात नाही. तर जेव्हा स्त्रीला वाटतं की ती मुलाला जन्म देईल, तेव्हापासून या मुलाची जन्मतारीख गृहीत धरली जाते. LinkedIn वर एलिझाबेथ नासाका नावाच्या युजरने या जमातीच्या अनोख्या विश्वासाशी संबंधित माहिती दिली. 2 तरुणींच्या प्रेमात पडला तरुण; लग्नाआधीच झाला दोन मुलांचा बाप, अखेर घेतला मोठा निर्णय एलिझाबेथने लिहिलं की स्त्री एका झाडाखाली बसते आणि बाळाला जन्म देण्याशी संबंधित गाणं ऐकण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तिला असं वाटतं की मुलाने तिला गाणं सुचवलं आहे, म्हणजे गाणं जेव्हा तिला सुचतं, तेव्हा ती हे गाणं तिच्या जोडीदाराला सांगते. यानंतर दोघंही शारीरिक संबंध ठेवतानाही हे गाणं गातात. संबंधित स्त्री गरोदर राहिल्यावर ती हे गाणं जमातीतील इतर स्त्रियांना शिकवतं आणि सर्वजणी ते गाणं लक्षात ठेवतात. यानंतर गरोदरपणादरम्यान सगळे तिला घेरतात आणि हे गाणं सुनावतात. बाळ जन्मल्यापासून ते मोठे होईपर्यंत गावातील प्रत्येक व्यक्तीला मुलाचं गाणं आठवतं. हे गाणं ते प्रत्येक परिस्थितीत गातात. म्हणजे मनोबल वाढवण्यासाठी, दुखापत झाल्यास आराम देण्यासाठी किंवा कोणतीही चूक झाल्यावरही हे गाणं ऐकवलं जातं. यामुळे, व्यक्ती नेहमी लक्षात ठेवते की त्याचं वास्तव काय आहे. माणूस मरेपर्यंत हे गाणं लोक ऐकवत राहतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत हे गाणं त्या व्यक्तीसाठी गायलं जातं. इथले लोक दुसऱ्या देशातून ऑर्डर करतात पिझ्झा; विमानाने होते डिलिव्हरी, कारण जाणून चक्रावून जाल तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या जमातीच्या महिला आयुष्यात फक्त एकदाच आंघोळ करतात, तीही त्यांच्या लग्नाच्या दिवशी (Himba Women Bath only Once in Life). याशिवाय तिला पाण्याचा वापर करून कपडेही धुता येत नाहीत. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी हिंबा जमातीच्या स्त्रिया पाण्यात विशेष औषधी वनस्पती उकळतात आणि त्याच्या वाफेने स्वतःला स्वच्छ करतात. त्यामुळे शरीरातून दुर्गंधी येत नाही. याशिवाय उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी महिला प्राण्यांच्या चरबीपासून आणि लोह, हेमॅटाइट सारख्या खनिज घटकांपासून खास लोशन बनवून शरीरावर लावतात. या घटकांमुळे शरीर लाल होतं, ज्यामुळे ती स्वतःला पुरुषांपासून वेगळं करू शकते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Culture and tradition, Viral news

    पुढील बातम्या