मराठी बातम्या /बातम्या /Viral /नोकरी सोडून महिलेनं सुरू केलं Zoom कॉलवरुन रोमान्स शिकवण्याचं काम; आता करते बक्कळ कमाई

नोकरी सोडून महिलेनं सुरू केलं Zoom कॉलवरुन रोमान्स शिकवण्याचं काम; आता करते बक्कळ कमाई

रीवने अॅडल्ट साईट ओन्लीफॅन्सवर (Adult Content on OnlyFans) आपलं अकाऊंट सुरू केलं आणि आपला बोल्ड फोटो तसंच व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली

रीवने अॅडल्ट साईट ओन्लीफॅन्सवर (Adult Content on OnlyFans) आपलं अकाऊंट सुरू केलं आणि आपला बोल्ड फोटो तसंच व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली

रीवने अॅडल्ट साईट ओन्लीफॅन्सवर (Adult Content on OnlyFans) आपलं अकाऊंट सुरू केलं आणि आपला बोल्ड फोटो तसंच व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली

नवी दिल्ली 02 जानेवारी : अनेकदा लोक आपल्या नोकरीला कंटाळून लवकर नोकरी सोडून देतात. काही लोक नोकरी बदलूनही आनंदी राहात नाहीत, कारण त्यांना शिफ्टमध्ये काम करणं, ऑफिसर कल्चर आणि बॉसचा दबाव सहन होत नाही. असंच काहीसं अमेरिकेतील एका महिलेसोबतही घडलं. ही महिला आपल्या नोकरीला इतकी कंटाळली की तिने पहिली नोकरी जाताच नोकरी करणंच सोडलं (Woman Leaves Job) आणि झूम कॉलच्या (Zoom Call) माध्यमातून वेगळंच काम सुरू केलं.

व्यक्तीने मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला केले मेसेज; वाचून शॉक झाली महिला

न्यूयॉर्कमध्ये राहणारी 37 वर्षीय रीव रूसिफर अॅडवरटायजिंग आणि मार्केटिंग कंपनीत दहा वर्षापासून काम करत होती. मात्र तिला कामाचा प्रचंड त्रास होत होता. इतक्यात तिला नोकरीवरून काढण्यात आलं आणि तिचं संपूर्ण जगच बदललं. मात्र रीवने या संधीचं सोनं केलं. रीवला नेहमीच अॅडल्ट कंटेंट बनवण्याची इच्छा होती आणि नोकरी गेल्यावर तिने हेच केलं.

रीवने अॅडल्ट साईट ओन्लीफॅन्सवर (Adult Content on Only Fans) आपलं अकाऊंट सुरू केलं आणि आपला बोल्ड फोटो तसंच व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आणि लोक घरातच राहू लागले तेव्हा रीवने आपला बिझनेस वाढवण्यासाठी नवी पद्धत शोधली. तिने झूमच्या माध्यमातून लोकांना जोडण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ती ४०-६० लोकांना झूम कॉलच्या (Woman Host Adult Party on Zoom) माध्यमातून जोडते आणि सगळे सोबतच इंटिमेट क्षण शेअर करतात.

नवीन वर्षाचा पहिला दिवसच ठरला सर्वात वाईट; बॉयफ्रेंडचं सत्य समजताच हादरली

डेली स्टार या वेबसाईटच्या वृत्तानुसार, रीवने सांगितलं की यातून ती पैसेही कमावते आणि लोकांच्या मनात शारीरिक संबंधाबद्दल असलेले गैरसमजही दूर करते. तिने सांगितलं की झूम कॉलच्या माध्यमातून ती लोकांसोबत जोडली जाते आणि लोकही शारीरिक संबंधाबद्दल तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलतात. यासोबतच ती त्यांना रिलेशनशिप, रोमान्स, रोमॅन्टिक फोटो काढण्याचं ट्रेनिंगही देते. या ट्रेनिंगला वर्कशॉप म्हटलं जातं. यात सहभागी होण्यासाठी लोकांना मोठा रक्कम द्यावी लागते. याच माध्यमातून रीव भरपूर कमाई करते.

First published:

Tags: Porn sites, Porn star