Home /News /viral /

नवीन वर्षाचा पहिला दिवसच ठरला सर्वात वाईट; बॉयफ्रेंडबाबतचं ते सत्य समजताच हादरली तरुणी

नवीन वर्षाचा पहिला दिवसच ठरला सर्वात वाईट; बॉयफ्रेंडबाबतचं ते सत्य समजताच हादरली तरुणी

एलीने सांगितलं की तिची ओळख 32 वर्षाच्या रॉस याच्यासोबत जानेवारी 2019 मध्ये टिंडरवर झाली. काहीच दिवसात त्यांना एकमेकांवर प्रेम झालं

  नवी दिल्ली 02 जानेवारी : नवीन वर्ष (New Year) अनेक नवीन आशा घेऊन येतं. बरेच लोक नवीन वर्षाकडे आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी मिळालेली नवी संधी म्हणून पाहतात. मात्र, प्रत्येकासोबतच असं होत नाही. काही लोकांना अनेक दुःखांचा सामना करावा लागतो. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबतही असंच घडलं. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिला आपल्या बॉयफ्रेंडचं (Cheater Boyfriend) घृणास्पद कृत्य समजलं. अजबच! पती-पत्नीने एकमेकांसाठी बनवले विचित्र नियम; ऐकूनच भडकले नेटकरी मॅनचेस्टमध्ये राहणारी 30 वर्षीय एली न्यूशॅम हिने नुकतंच डेली स्टार वेबसाईटसोबत बोलताना आपल्या बॉयफ्रेंडबाबत असा खुलासा केला की हे जाणून सगळेच हैराण झाले. एलीने सांगितलं की तिची ओळख 32 वर्षाच्या रॉस याच्यासोबत जानेवारी 2019 मध्ये टिंडरवर झाली. काहीच दिवसात त्यांना एकमेकांवर प्रेम झालं. काही काळाचच एली रॉससोबत त्याच्या घरातच शिफ्ट झाली. इथेच रॉसचे आई-वडिलही राहात होते. दोघांचं नातं अगदी चांगलं होतं. 2020 च्या सुरुवातीला एलीने रॉसच्या घरापासून काही अंतरावरच स्वतःचा फ्लॅट घेतला. रॉस अनेकदा तिला इथे भेटण्यासाठी येत असे. कोरोना काळातही त्याने आपल्या प्रेयसीला भरपूर मदत केली. मात्र, समस्या तेव्हा सुरू झाल्या जेव्हा 2020 वर्ष संपलं आणि 2021 वर्ष सुरू होत होतं. एलीने सांगितलं की तिला रॉसच्या कृत्याबद्दल 2021 च्या न्यू ईअरला समजलं. त्यादरम्यान तिला कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती आणि आपल्या घरीच आयसोलेट होती. 31 डिसेंबरला रॉसने एलीला काहीही संपर्क साधला नाही. सोबतच नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. या गोष्टीमुळे एली नाराज झाली, रॉसने तिचा फोनही उचलला नाही. दुसऱ्या दिवशी रॉसने तिला सांगितलं की तो आपल्या मित्राच्या घरी होता. एलीला त्याच्या या मित्राबद्दल काहीच माहिती नसल्याने ती हैराण झाली. काही वेळाने तिने रॉसला पुन्हा एकदा फोन केला, तेव्हा हा फोन एका तरुणीने उचलला आणि एलीला वारंवार फोन करू नकोस, असं सांगितलं. हे ऐकून एलीला धक्का बसला. तिचा क्वारंटाईन काळ संपला तेव्हा ती रॉसला भेटली आणि त्याच्याकडे उत्तर मागितलं.

  नवरदेवाला मिळाली मित्रांच्या चुकीची शिक्षा; होणाऱ्या पत्नीने दिला लग्नास नकार

  रॉसने यावेळी खुलासा केला की नवीन वर्षाच्या वेळी ३ दिवस तो एका तरुणीच्या घरी होती. तिच्यासोबत त्याची ओळख डेटिंग साईटवर झाली. रॉसने तिच्यासोबत संबंधही ठेवले, मात्र आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप असल्याचं त्याने म्हटलं. एलीने सांगितलं की हे समजताच तिने रॉससोबतचं नातं तोडलं (Breakup With Cheater Boyfriend) आणि आता ती यातून पूर्णपणे बाहेर आली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Corona patient, Relationship

  पुढील बातम्या