Home /News /viral /

व्यक्तीने मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला केले मेसेज; मजकूर वाचून शॉक झाली महिला

व्यक्तीने मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला केले मेसेज; मजकूर वाचून शॉक झाली महिला

या व्यक्तीने महिलेसोबत बोलताना म्हटलं की तुझा पती खूप चांगला माणूस आहे, म्हणजे होता. या गोष्टीवर महिला भडकली

    नवी दिल्ली 02 जानेवारी : आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावणं हा कोणाच्याही आयुष्यातील अतिशय वेदनादायी क्षण असतो. जर ती जवळची व्यक्ती पती किंवा पत्नी असेल तर दुःखाचा डोंगरच कोसळतो. मात्र, अनेक घाणेरड्या विचारसणीचे लोक एखाद्या महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर चुकीची नजर ठेवतात. या लोकांना असं वाटतं की महिलेच्या पतीचं निधन हे त्यांच्यासाठी एखाद्या संधीप्रमाणे आहे. असंच काहीसं नुकतंच एका महिलेसोबत घडलं (Woman Received Vulgar message from Man). तिच्या पतीच्या निधनाला एक महिनाही पूर्ण झाला नव्हता, इतक्यातच तिच्या पतीसोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली (Vulgar Chat with Woman). अवघ्या दोन वर्षात रस्त्यावर आला अरबपती; ती एक चूक पडली भलतीच महागात सोशल मीडिया साईट रेडिटवर एका महिलेनं नुकतंच अतिशय हैराण करणारी घटना शेअर केला आहे. महिलेनं शेअर केलेली पोस्ट वाचून सगळेच हैराण झाले आहेत. महिलेनं सांगितलं, की तिच्या पतीच्या निधनाला एक महिना होताच त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याने तिला मेसेज केला. सुरुवातीला त्याने तिची विचारपूस करत काळजी दाखवली. मग तिच्या पतीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. मात्र यानंतर त्याने जे काही बोलायला सुरुवात केली, ते वाचून महिलेला धक्का बसला. या व्यक्तीने महिलेसोबत बोलताना म्हटलं की तुझा पती खूप चांगला माणूस आहे, म्हणजे होता. या गोष्टीवर महिला भडकली. तिने म्हटलं की माझा पती आता नाही राहिला, याची आठवण करून देण्यासाठी धन्यवाद. हळूहळू या व्यक्तीने महिलेला थेट डेटवर येण्याची ऑफर दिली. जेव्हा महिलेनं नकार दिला तेव्हा या व्यक्तीने विचित्र भाषेचा प्रयोग सुरू केला. तो तिला सांगू लागला, की जर तू माझ्यासोबत डेटवर आली तर तुझ्या पतीला आनंद होईल. कारण त्याची अशी इच्छा होती की त्याच्या पत्नीने माझ्यासारख्या व्यक्तीसोबत राहावं. अजबच! पती-पत्नीने एकमेकांसाठी बनवले विचित्र नियम; ऐकूनच भडकले नेटकरी महिलेनं सांगितलं की ती या व्यक्तीचे मेसेज वाचून अतिशय शॉक झाली. तिने या चॅटचा स्क्रीनशॉट रेडिट ग्रुपवर पोस्ट केला. इथे अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. एका महिलेनं म्हटलं की अशाप्रकारची लोकं कचऱ्यापेक्षाही घाणेरडी असतात. तर आणखी एका महिलेनं सांगितलं की तिच्यासोबतही असंच घडलं होतं, जेव्हा तिच्या होणाऱ्या पतीचं निधन झालं होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Wife and husband

    पुढील बातम्या