भोपाळ 15 मे : मध्य प्रदेशमधील उज्जैन स्टेशनवर शनिवारी एक विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन मुलं आणि त्यांच्या आईचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेत एका आईने आपल्या दोन निष्पाप मुलांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं आणि नंतर स्वतःही उडी घेतली (Woman Jumps out of Moving Train with 2 Sons). दरम्यान, तिथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबलने कमालीची चपळाई दाखवत महिलेला ट्रेनच्या खाली जाण्यापासून वाचवलं. आई आणि दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भीषण अपघातात गाडीचा अक्षऱशः चक्काचूर झाला; मात्र चालकाला खरचटलंही नाही, थक्क करणारा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला घाईगडबडीत चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिला हा प्रकार कळला असता काय करावं हेच तिला समजलं नाही. तिने ताबडतोब आधी आपल्या मोठ्या मुलाला आणि नंतर धाकट्याला चालू ट्रेनमधून खाली फेकलं. दोघं स्टेशनवर पडल्यावर महिलेनेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. उडी मारताच ती ट्रेनसोबत ओढत जाऊ लागली. सुदैवाने त्याच डब्याजवळ कॉन्स्टेबल महेश कुशवाह उभे होते. त्यांनी महिलेला ट्रेनखाली जाण्यापासून वाचवत मरणाच्या दारातून परत आणलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जीआरपी कॉन्स्टेबल महेश कुशवाह यांना त्यांच्या कामासाठी बक्षीसही देणार आहे.
"जल्दबाजी हो सकती है घातक"#उज्जैन- गलत ट्रैन में सवार हुई महिला,पता चलने पर जल्दबाजी में प्लेटफॉर्म पर चलती ट्रेन से उतरी, संतुलन बिगड़ने से महिला ट्रैन की चपेट में आने से बची,प्लेटफार्म पर मौजूद पुलिस कर्मी महेश कुशवाहा की सतर्कता से हादसा टला,#GRP @RailwaySeva#Ujjain #CCTV pic.twitter.com/943niH1usl
— Vikas Singh Chauhan (@vikassingh218) May 14, 2022
ही घटना शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नी आणि मुलांसह एक व्यक्ती उज्जैन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचला, मात्र त्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जायचं होतं. हे सर्वजण सिहोरला जात होते. कुटुंबाला स्टेशनवर सोडून नवरा तिकीट काढायला गेला. तो निघताच जयपूर-नागपूर एक्स्प्रेस गाडी स्थानकावर आली. महिलेला वाटलं की आपल्याला या ट्रेननेच जायचं आहे. म्हणून ती घाईघाईने मुलांसह त्यात चढली. VIDEO: तरुणाने रुमचा दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावलं; दार तोडताच आतील दृश्य पाहून सगळे थक्क महिलेने ट्रेनमध्ये चढल्यावर आतमधील लोकांकडून माहिती घेतली असता ती चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचं तिला समजलं. यानंतर ती भलतीच गोंधळली. तिला काहीच सुचलं नाही आणि घाबरून तिने आपला आणि मुलांचाही जीव धोक्यात टाकला. सुदैवाने कॉन्स्टेबलने महिलेचे प्राण वाचवले. यानंतर ट्रेनमधील एका प्रवाशाने तिचं सामान खाली फेकलं.