नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : मगरीचा जबडा अतिशय शक्तीशाली मानला जातो. एखादा प्राणी किंवा माणूस मगरीच्या तावडीत (Crocodile Attack) सापडला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य असतं. यामुळे कोणीही या भयंकर प्राण्यापासून दूर राहाणंच भलं समजतं. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे जो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक महिला भल्यामोठ्या मगरीला मिठी मारताना दिसते (Woman Hugged the Crocodile). हे दृश्य पाहून कोणालाही धडकी भरेल. हैराण करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
VIDEO : सासरी आलेल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला अन्.., पाहा दिराचा प्रताप
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महिला जमिनीवर मगरीसोबत झोपलेली आहे. हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. ज्या प्राण्याला पाहून सर्वांचाच थरकाप उडतो त्या प्राण्यासोबत ही महिला अतिशय आरामात झोपल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर ती या मगरीला मिठीही मारत आहे. तिच्याकडे पाहून असं जाणवतं की तिला मगरीची जराही भिती वाटत नाहीये.
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर beautiffulearth नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. .यूजरनं या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, मी डार्थ गेटोरला (Darth Gator) मिठी मारली. डार्थ कॅलिफोर्नियामधील अतिशय भयंकर प्रजातीचा गेटोर आहे. याला पाळीव प्राणी म्हणून ठेवणं बेकायदेशीर आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत १३ लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
VIDEO : चिमुकल्याला सर्व चारचाकी गाड्यांची माहिती, उत्तरं ऐकून अँकरही अवाक
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, मी जे बघतोय ते तुम्हीही पाहत आहात का? तर काहींनी ही पाळीव मगर आहे का असा सवाल केला आहे. कारण ही आक्रमक असती तर तिनं नक्कीच या महिलेवर हल्ला केला असता. काहींनी तिला अशा प्राण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण हे कधीही हल्ला करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Shocking viral video