नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : नवरीबाई (Bride) जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा अनेक नवी नाती (New Relations) समजून घ्यायला तिला बराच वेळ लागतो. मात्र, काही नाती अशीही असतात जी समजायला अजिबातही वेळ लागत नाही. काही काळातच ही नाती अगदी घट्ट होतात आणि आपुलकीची जाणीव करून देतात. आम्ही बोलत आहोत दीर आणि वहिनीच्या नात्याबद्दल. सासू आणि सासऱ्यांसोबतच दिरदेखील आपल्या वहिनीची आतुरतेनं वाट बघत असतो. नवरीबाई सासरी येताच सर्वात आधी दीर तिच्यासोबत मस्करी करण्यासाठी पुढे येतो. वहिनी आणि दिराचं हे बॉन्डिंग अतिशय खास (Special Bonding) असतं.
नवरीसमोरच मुलानं केलं असं काही की भडकला नवरदेव; स्टेजवरच लगावली कानशिलात, VIDEO
वहिनी आपल्या दिरावर आईप्रमाणे प्रेम करते आणि दिरही वहिनीला आईसमान मानतो. लग्नात दीर आणि वहिनी अनेक खेळही खेळतात. काही लग्नांच्यात पाहायला मिळतं की नवरीबाई सासरी येताच नवरदेवाचे भाऊ लगेचच तिथे हजर होतात. दीर आपल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसतात आणि तेव्हापर्यंत उतरत नाहीत जोपर्यंत वहिनी त्यांना भेटवस्तू देत नाही. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Bride) पाहायला मिळतं. यात दिसतं की दीर आपल्या नव्या वहिनीच्या मांडीवर येऊन बसतो आणि मग पैशाची मागणी करतो.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की दीर आपल्या वहिनीच्या मांडीवर जाऊन बसतो तेव्हा नवरी हसू लागते. मात्र दिरही मस्करी करण्यात माघार घेत नाही. तो तोपर्यंत बसून राहतो जोपर्यंत त्याला वहिनीकडून पैसे मिळत नाहीत. वहिनीच्या मांडीवर बसून तो तिचे दोन्ही हात पकडून ठेवतो आणि हसू लागतो. या दिराने आपल्या वहिनीकडे मोठी मागणी केली.
कोंबड्याची पण सटकली; मुलाच्या मागे लागला अन्..., कधीच पाहिला नसेल असा VIDEO
दिराची ही मस्ती पाहून नवरीबाईही हसू लागली. नवरदेवही आपल्या भावाची आणि बायकोची ही केमिस्ट्री पाहून हसू लागतो. यूट्यूबवर वहिनी आणि दिराचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. pOOj@ r@nA tHaKuR नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून एक लाखहून अधिकांनी पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Video Viral On Social Media