नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : लहान मुलं ही खेळण्यातील गाड्या आणि लहान मोठ्या वस्तू यातच रमतात. लहान असताना त्यांना चारचाकी किंवा इतर गाड्यांची फार माहिती घेण्याची शक्यतो आवड नसते किंवा याबद्दल त्यांना फार काही उत्साहही नसतो. तुम्ही अनेकदा लहान मुलांना गोष्टी सांगताना किंवा कविता म्हणताना ऐकलं असेल. मात्र, एखादा लहान मुलगा मार्केटमध्ये आलेल्या प्रत्येक लेटेस्ट आणि जुन्या गाड्यांबद्दलही फटाफट सांगू शकतो (Latest Car in Market), असं म्हटल्यावर कदाचित कोणाला विश्वासही बसणार नाही.
कोंबड्याची पण सटकली; मुलाच्या मागे लागला अन्..., कधीच पाहिला नसेल असा VIDEO
सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video of Little Boy) झाला आहे. या चिमुकल्याची बुद्धीमत्ता आणि गाड्यांबद्दल त्याला असलेल्या माहिती पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की एक चिमुकला मारूती कंपनीच्या एका चारचाकी शेजारी उभा आहे. अँकर दीपाली राणा (Deepali Rana) या चिमुकल्याला या गाडीबद्दल विचारू लागतात. यावर हा मुलगा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत या गाडीची वैशिष्ट्यं सांगतो.
Youngest auto enthusiast I have ever met . @Tatamotorsev @TataMotors_Cars @TataMotors and @Maruti_Corp should must listen pic.twitter.com/COSWxDvGFK
— Deepali Rana (@deepaliranaa) November 15, 2021
इतकंच नाही तर यानंतर अँकर त्याला मारूती कंपनीच्या (Maruti Car) इतर गाड्यांबद्दलही विचारते. कोणती चारचाकी चांगली आहे, कोणती नाही आणि याची कारणं काय आहेत, हे सगळं हा मुलगा अगदी आरामात आणि आत्मविश्वासाने सांगतो. तू भविष्यात कोणती गाडी घेशील असा सवाल केला असता तो सांगतो की मी टाटाची गाडी घेईल मारूतीची नाही. याचं कारणही तो सांगतो की मारूतीच्या कार अधिक सेफ नाहीत, मात्र टाटाच्या कार सेफ आहेत.
जबरदस्त जुगाड! सायकललाच बनवलं बुलेट; VIDEO पाहून मोठमोठे इंजिनिअरही होतील अवाक
आपल्याला याशिवाय इतरही कंपनींच्या कारबद्दल पुरेपूर माहिती असल्याचं हा चिमुकला शेवटी बोलतो. त्याची ही उत्तरं ऐकून दीपाली राणादेखील अवाक झाल्या. दीपाली राणा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ४३ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत या चिमुकल्याचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Video Viral On Social Media