Home /News /viral /

महिलेनं रुग्णालयात दाखल असलेल्या पतीच्या पायाजवळ लपवली अजब चिठ्ठी; वाचून डॉक्टरही थक्क

महिलेनं रुग्णालयात दाखल असलेल्या पतीच्या पायाजवळ लपवली अजब चिठ्ठी; वाचून डॉक्टरही थक्क

पती रुग्णालयात असताना रेजिनाने डॉक्टरांसोबतच प्रँक करण्याचा प्लॅन केला. तिने एक नोट लिहून पतीच्या हिप्समध्ये ठेवली (Wife Hide Letter in Husband’s Hips)

    नवी दिल्ली 11 जानेवारी : आजकाल लोकांसोबत केलेल्या प्रँक व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळते. लोक अनेकदा प्रँक व्हिडिओ बनवतात, यात ते एखाद्या व्यक्तीसोबत मस्करी करताना दिसतात. अनेकदा तर हे लोक अनोळखी लोकांसोबतही प्रँक करतात. नुकतंच एका महिला डॉक्टरसोबतही असाच प्रँक (Prank With Doctor) झाला. महिलेनं आपल्या पतीच्या हिप्सच्या मध्ये एक छोटं लेटर ठेवलं (Woman Hide Letter for Doctor in Husband's Hips) . 12 वर्षीय मुलीचं बॉक्सिंग स्किल पाहून व्हाल अवाक; हाताने पाडलं मोठं झाड, VIDEO बातमी वाचून ही हैराण करणारी बाब वाटत असली तर हा प्रँक लोकांना चांगलाच हसवत आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रेजिना फलांगे नावाच्या महिलेनं आपलं टिकटॉक अकाऊंट @Regina_Phalange1219 वरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती रुग्णालयात डॉक्टर्ससोबत प्रँक करताना दिसते. व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की तिच्या पतीची अनेकदा कोलनोस्कोपी होत असते. यासाठी ते रुग्णलयात दाखल असतात. यावेळी पती रुग्णालयात असताना रेजिनाने डॉक्टरांसोबतच प्रँक करण्याचा प्लॅन केला. तिने एक नोट लिहून पतीच्या हिप्समध्ये ठेवली (Wife Hide Letter in Husband’s Hips) आणि समोर येऊन बसली. डॉक्टरांनी सर्जरीला (Surgery) सुरुवात करताना त्यांना हिप्समध्ये ही नोट आढळली. यावर लिहिलं होतं, की आम्ही तुमच्या कारची वॉरंटी वाढवण्यासाठी तुमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. हे वाचताच डॉक्टर मोठमोठ्याने हसू लागल्या. कारण साल 2020 मध्ये जेव्हा कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली, तेव्हा ही लाईन इंटरनेटवर फ्रॉड करण्यासाठी लोकांनी भरपूर वापरली आणि त्या लोकांनाही मेसेज केला, ज्यांच्याकडे कारही नव्हती. Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO महिलेनं व्हिडिओमध्ये डॉक्टरची प्रतिक्रियाही रेकॉर्ड केली आहे. ही प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर रेजिनाच्या या कृत्याला चुकीचंही म्हटलं आहे. तिनं आपल्या आजारी पतीची मस्करी केल्यानं लोक भडकले आहेत. मात्र, रेजिनाने सांगितलं की तिने आपल्या पतीला विचारूनच हा प्रँक केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral news, Woman doctor

    पुढील बातम्या