Home /News /viral /

Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; व्यक्तीची काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO

Shocking! चक्क मगरीसोबत मस्ती करायला गेला; व्यक्तीची काय भयंकर अवस्था झाली पाहा VIDEO

मगरीसोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं.

    मुंबई, 10 जानेवारी : मगर (Crocodile video)जी एका डावात आपला निशाणा साधते. जसा जंगलाचा राजा सिंह तसं मगरीला पाण्याचा राजा समजलं जातं (Animal video) . सिंह, बिबट्या, वाघ अशा बलाढ्य प्राण्यांचाही तिच्यासमोर टिकाव लागत नाही. हे प्राणीही तिच्यापासून आपला जीव वाचवू शकत नाही. अशा मगरीसोबत चक्क एक व्यक्ती खेळताना दिसली (Crocodile attack video)जी. मगरीसोबत मस्ती करणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देणं किंवा स्वतः मृत्यूच्या दाढेत जाणं म्हणजे काय याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडीओ आहे. पाण्यात माशांसोबत खेळावं तसं ही व्यक्ती मगरीसोबत खेळायला गेली. मगस आपलं काहीच करू शकत नाही, आपल्याला मगरीची भीती वाटत नाही अशाच आवेशात छाती ताणून ही व्यक्ती मगरीसोबत मस्ती करू लागली. पण दुसऱ्याच क्षणी या व्यक्तीची भयंकर अवस्था झाली (Man hand in crocodile mouth). हे वाचा - रेस्टॉरंटमध्ये घुसला चवताळलेला रेडा आणि...; अंगावर काटा आणणारा थरारक LIVE VIDEO व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती मजेमजेत मगरीच्या तोंडात आपला हात देते. मगर ती मगरच तिने त्या व्यक्तीचा हात समोर दिसताच खतरनाक हल्ला केला. तिने आपल्या जबड्यात त्याचा हात धरून ठेवला. ही व्यक्ती मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करते. पण मगर काही त्याला सोडत नाही. अखेर ही व्यक्ती त्या मगरीच्या पाठीवर बसते आणि कसंबसं करून अथक प्रयत्नानंतर मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढते.
    View this post on Instagram

    A post shared by بوفیلم (@bufilms)

    bufilms नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून मगरीच्या तावडीतून सुटका झाली. हे वाचा - VIDEO - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा याआधीही एका व्यक्तीने मगरीच्या तोंडात आपला हात टाकला होता. मगरीसोबतचा हा नको तो स्टंट त्याला चांगलाच महागात पडला. मगर हल्ला करण्यात अगदीच पटाईत आहे, सवयीप्रमाणे तिनं इथेही तसंच काहीसं केलं. काहीच सेकंदाच मगरीनं या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात पकडला.
    हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.  सुदैवाने मगरीच्या जबड्यातून आपला हात बाहेर काढण्यात हा व्यक्ती यशस्वी ठरला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या