इव्हनिका ही मूळची रशियाची असून ती लहानपणापासून बॉक्सिंगचा सराव करत आहे. तिचे वडील रुस्ट्रम हे स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षणात इव्हनिका इतकी कुशल बॉक्सर बनली आहे की तिच्यासमोर एक झाडही टिकू शकत नाही. व्हिडिओमध्ये ही मुलगी झाडाला बुक्क्यांनी मारताना दिसते. वेग आणि ताकदीने तिने आधी झाडाला बुक्क्या मारून कमकुवत केले आणि नंतर हळूहळू झाड कोसळले. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. क्रॅश झालेल्या विमानाला ट्रेनने दिली धडक; थोडक्यात बचावला पायलटचा जीव, VIDEO इव्हनिकाचे वडील रुस्ट्रम यांच्याशिवाय तिच्या 7 भावंडांनाही बॉक्सिंगची तितकीच आवड आहे. मुलांची आई आनियादेखील एक अव्वल क्रीडापटू होती, परंतु ती एक जिम्नॅस्ट होती. एका मिनिटात 65 पंच मारण्याचा विश्वविक्रमही 12 वर्षीय इव्हनिकाच्या नावावर आहे. ती आपल्या शक्तिशाली ठोसेने दरवाजे आणि सर्व मजबूत वस्तू तोडण्यात माहिर आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून ती तिच्या कौशल्यावर काम करत आहे. मुलीची आवड पाहून वडिलांनीही तिला बॉक्सिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आता सर्वांसमोर आहे.Watch Little Evnika Saadvakass also known as the 'World's Strongest Girl' punching down a tree using her Amazing boxing skills.
Shes has been training hard since she was three and dreams of becoming a professional boxer one day. pic.twitter.com/A4ERWjB57b — Quarantine Traders (@QuarantineTrad1) January 8, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.