Home /News /viral /

बापरे! 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडला महिन्याला 15 लाख पगार देते ही महिला; बदल्यात करून घेते हे काम

बापरे! 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडला महिन्याला 15 लाख पगार देते ही महिला; बदल्यात करून घेते हे काम

एका महिन्यात ती त्याच्यावर १५ लाख रुपये खर्च करते. याच्या बदल्यात तिचा बॉयफ्रेंड तिला काय देतो, याचं उत्तरही जूलीनं दिलं

    नवी दिल्ली 13 ऑक्टोबर : आजकाल रिलेशनशिप आणि प्रेमात वयातील अंतराचा काहीही (Age Gap in Relationship) फरक पडत नाही. विशेषतः परदेशात तर अशी अनेक प्रकरणं पाहायला मिळतात ज्यात बॉयफ्रेंडचं वय गर्लफ्रेंडपेक्षा भरपूर कमी असतं (Boyfriend is younger than Girlfriend). आपलं असंच नातं 44 वर्षाच्या जूलीनं सोशल मीडियावर (Social Media) सांगितलं आहे. तिनं सांगितलं, की ती आपल्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या आपल्या बॉयफ्रेंडला फिक्स सॅलरी (Woman Give Fixed Salary to Boyfriend) देते. जेणेकरून ती त्याच्याकडून काहीही करून घेऊ शकते. लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले TikTok वरुन आपल्या नात्याबद्दल जगाला सांगताना जूलीनं म्हटलं, तिला या गोष्टीचं अजिबातही वाईट वाटतं नाही की ती आपल्या बॉयफ्रेंडवर यासाठी पैसे खर्च करते की त्यानं आपली सगळी कामं करावी. जूलीचा बॉयफ्रेंड वयानं तिच्यापेक्षा १५ वर्ष लहान आहे. ती त्याच्याकडून जेवण बनवण्यासापासून पूल स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं करून घेते. @julie.withthebooty नावाचं टीकटॉक अकाऊंट चालवणाऱ्या महिलेनं स्वतःचं वय ४४ वर्ष असल्याचं सांगितलं. तिचा बॉयफ्रेंड २९ वर्षाचा आहे. तिनं आपल्या टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितलं, की लोक तिला सर्वात आधी हा सवाल करतात की तिचं नातं कसं आहे? यावर जूलीनं उत्तर दिलं की ती आपल्या तरुण बॉयफ्रेंडसाठी प्रत्येक ती गोष्ट घेऊन येते, जी त्याला हवी आहे. इतकंच नाही तर एका महिन्यात ती त्याच्यावर १५ लाख रुपये खर्च करते. याच्या बदल्यात तिचा बॉयफ्रेंड तिला काय देतो, याचं उत्तरही जूलीनं दिलं. जूलीचं म्हणणं आहे, की त्याच्यावर खर्च केल्याच्या बदल्यात तो मला ती प्रत्येक गोष्ट देतो, जी मला हवी आहे. Shocking! GF भेटणार म्हणून चढला जोश; तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट गमावला जूलीनं पुढे असंही म्हटलं, की या महिन्यात बॉयफ्रेंडवर लाखो रुपये खर्च करूनही तो पूल साफ करायचं विसरून गेला. या दोघांमधील वयाचं अंतर पाहता अनेकजण जूलीला म्हणतात की तो लवकरच तुला सोडून एखाद्या तरुणीकडे जाईल. यावर जूली म्हणते, त्याला या गोष्टीची जास्त भीती पाहिजे की मी त्याला सोडेल. जूलीचं असं म्हणणं आहे, की तिला तरुण मुलांना डेट करायला आवडतं. तिनं हेदेखील सांगितलं, की जेव्हा ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बाहेर पडते तेव्हा अनेकजण तिला त्याची आई समजतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Boyfriend, Relationship, Viral news

    पुढील बातम्या