Home /News /lifestyle /

लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम; तब्बल 7 कोटींचे मालक बनले

लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम; तब्बल 7 कोटींचे मालक बनले

लग्नाऐवजी हनीमून करण्याऐवजी कपलने घेतला हा निर्णय.

    वॉशिंग्टन, 12 ऑक्टोबर : लग्न (Wedding) झाल्यानंतर शक्यतो बहुतेक दाम्पत्य हनीमूनचा (Honeymoon) विचार करतात. फिरायला कुठे जायचं याचं प्लॅनिंग करतात. पण अमेरिकेतील एका दाम्पत्याने लग्नानंतर हनीमून बाजूला ठेवलं. हनीमूनऐवजी फक्त एक काम केलं आणि काही क्षणातच हे नवदाम्पत्य कोट्यधीश झाले (Couple win lottery after wedding). त्यांनी तब्बल 7 कोटी रुपये कमवले. लग्नानंतर आयुष्य, नशीब बदलतं असं म्हटलं जातं. पण आपलं नशीब असं बदलेल, याचा विचारही या दाम्पत्याने केला नव्हता.  उत्तर कॅरोलिनातील या दाम्पत्याचं नशीबच फळफळलं. त्यांनी लग्नानंतर चार दिवसांतच 1 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 7,54,88,000 रुपये मिळवले आहेत. हे वाचा - Shocking! गर्लफ्रेंड भेटणार म्हणून चढला जोश; उत्साहात तरुणाने आपला Private part गमावला लेक्सिंगटनमध्ये राहणारे 60 वर्षांचे माइकल एबरनेथी. यांनी नुकतंच लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी आपलं नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आणि लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर चार दिवसांनी ते लेक्सिंगटनमध्ये शीटज स्टोरमध्ये गेले होते. तिथं त्यांनी 30 डॉलर मिलियनेयर मेकर तिकीट खरेदी केलं. ज्यामुळे आता ते कोट्यधीश बनले आहेत. हे वाचा - आजी-आजोबांचं गाव! इथं सर्वाधिक वयोवृद्ध, पुरुषांपेक्षा महिला जगतात जास्त कारण... एबरनेथी म्हणाले, ज्या पद्धतीने हे सर्व घडलं ते अभूतपूर्व आहे. हा एक आशीर्वाद आहे.  माझ्यासाठी हे लग्नाचं गिफ्टच आहे.  आता लॉटरीच्या पैशातून पुढच्या वर्षी आपण फ्लोरिडामध्ये हनीमूनला जाणार आहोत. याच पैशातून तो आपला हनीमूनचा सर्व खर्च भागवणार आहे. तसंच मी 60 वर्षांचा असल्याने भविष्यासाठीही काही पैसे गुंतवणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lottery, Money

    पुढील बातम्या