Home /News /viral /

तरुणीने बॉयफ्रेंडला पाठवला आपला असा फोटो की बघूनच शॉक झाला तरुण; लगेचच केला ब्रेकअप

तरुणीने बॉयफ्रेंडला पाठवला आपला असा फोटो की बघूनच शॉक झाला तरुण; लगेचच केला ब्रेकअप

हा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडवर फक्त यासाठी नाराज झाला, कारण तिने त्याला आपला अजब फोटो पाठवला (Woman Send Hairy Leg Photo to Boyfriend). यानंतर दोघांचं ब्रेकअप (Weird Reason of Breakup) झालं.

    नवी दिल्ली 29 जानेवारी : नातं मजबूत असेल तर प्रेयसी आणि प्रियकर यांच्या रिलेशनशिपमध्येही (Relationship) कधीही दुरावा येत नाही किंवा हे नातं कधीही तुटत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, कदाचित ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे. कारण अनेकदा लोक अशा काही गोष्टींमुळे नाराज होतात, जाणूनच कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक बॉयफ्रेंड चांगलाच चर्चेत आहे. हा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडवर फक्त यासाठी नाराज झाला, कारण तिने त्याला आपला अजब फोटो पाठवला (Woman Send Hairy Leg Photo to Boyfriend). यानंतर दोघांचं ब्रेकअप (Weird Reason of Breakup) झालं. वजन कमी करण्याच्या नादात मृत्यूच्या दारात गेला; तरुणाची अवस्था जाणून हादराल आता तुम्हीही विचारात पडला असाल की या फोटोमध्ये असं नेमकं काय होतं, की यामुळे थेट या कपलचं नातंच तुटलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, @bonedrymilkers नावाच्या टिकटॉकरने नुकतंच आपल्या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने सांगितलं की तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर फक्त या कारणामुळे नाराज झाला, कारण तिने तिच्या पायावरचे केस काढले नव्हते. व्हिडिओमध्ये तिने बॉयफ्रेंडचा मेसेजही दाखवला. महिलेनं म्हटलं की एक दिवस मस्करी म्हणून तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या पायाचा फोटो पाठवला. यात तिच्या पायावर भरपूर केस दिसत होते. महिलेनं फोटोसोबत मेसेज लिहिला, बघ माझ्या पायाचे केस किती मोठे झाले आहेत. महिलेला वाटलं की तिचा बॉयफ्रेंडही यावर विनोदी उत्तर देईल. मात्र घडलं उलट. हा व्यक्ती भडकला आणि त्याने म्हटलं की हे पाय घाणेरडे दिसत आहे आणि तू आपल्या पायाचे केस काढायला हवे, कारण हे अनहायजेनिक असतात. ऑनलाईन ट्रेंडमुळे महिला हैराण; मुलांच्या मस्तीमुळे होतायेत गरोदर, काय आहे प्रकरण महिलेनं सांगितलं की यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तिने आपल्या बॉयफ्रेंडला विचारलं की हे सर्व तू मस्करीमध्ये सांगत आहेस की सीरियसली. यावर उत्तर देत त्याने म्हटलं की मी अतिशय गांभीर्याने तुला हे सांगत आहे. यानंतर महिलेनं त्याला फोन केला आणि त्याच्यासोबत ब्रेकअप केला. तिचा बॉयफ्रेंडही एवढ्याशा गोष्टीवरुन ब्रेकअप करण्यास तयार झाला. व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं, अशा लोकांना लगेचच सोडून द्यायला हवं, जे या गोष्टींचंही वाईट वाटून घेतात. तर आणखी एकाने लिहिलं, पायावर केस असणं सामान्य बाब आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Breakup, Relationship

    पुढील बातम्या