नवी दिल्ली 29 जानेवारी : लग्नानंतर अनेकदा तुम्ही लोकांना बोलताना ऐकलं असेल की ते आपल्या पत्नीमुळे वैतागले आहेत. मात्र अनेकजणांनी 2 लग्न केल्याच्या घटनाही तुम्ही पाहिल्या असतील. परंतु आज आम्ही ज्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत, त्याने १-२ नाही तर तब्बल ८ लग्न केली आहेत
(Man Married with 8 Women). थायलंडमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला आठ बायका आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या सर्व बायका एकाच घरात, एकाच छताखाली राहतात.
हाताने किंग कोबराला पकडू लागला व्यक्ती; मागे वळून सापाने केला हल्ला पण.., VIDEO
थायलंडचा ऑन्ग डॅम सोरोट सोशल मीडियावर भरपूर चर्चेत राहातो. तो एक टॅटू आर्टिस्ट आहे. तो यामुळे चर्चेत राहातो कारण त्याला आठ बायका असून सगळ्या एकसोबत एकाच घराच राहतात. तुम्हाला असं वाटत असेल की या बायकांची एकमेकींसोबत भांडणं होत असतील. मात्र, असं काहीही नाही. त्यांचं एकमेकांवर तितकंच प्रेमही आहे. इतकंच नाही तर त्या सगळ्यांचं ऑन्गवरही खूप प्रेम आहे आणि त्या ऑन्गला जगातील सर्वात सज्जन व्यक्ती समजतात.

ऑन्गबाबतची सर्वात मजेशीर बाब म्हणजे त्याला या आठ बायका कशा मिळाल्या. प्रत्येक वेळी त्याला पहिल्याच नजरेत प्रेम झालं आणि या सर्वांना तो जिथे भेटला, ती जागाही विचित्र होती. पहिली पत्नी नॉन्ग स्प्राइट हिला तो आपल्या मित्राच्या लग्नात भेटला. पहिल्याच नजरेत त्याला तिच्यावर प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. दुसरी पत्नी नॉन्ग एल त्याला बाजारात दिसली. तिसरी पत्नी नॉन्ग नॅन हिच्यासोबत ऑन्गची भेट रुग्णालयात झाली. तर आपली चौथी, पाचवी आणि सहावी पत्नी यांची भेट ऑन्गसोबत इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकच्या माध्यमातून झाली. एकदा ऑन्ग आपल्या आईसोबत प्रसिद्ध मंदिरात गेला होता, तेव्हा त्याची भेट सातवी पत्नी नॉन्ग फिल्मसोबत झाली. तर आठव्या पत्नीला तो सुट्ट्यांच्या काळात भेटला, तेव्हा इतर बायकाही त्याच्यासोबत होत्या.
ऑनलाईन ट्रेंडमुळे महिला हैराण; मुलांच्या मस्तीमुळे होतायेत गरोदर, काय आहे प्रकरण
आठही बायकांनी सांगितलं की ऑन्ग त्या सर्वांवर सारखंच प्रेम करतो आणि सर्वांची काळजी घेतो. त्या सर्वांमध्ये कधीही भांडण होत नाही. सोशल मीडियावर लोकांना वाटतं की ऑन्ग भरपूर श्रीमंत असून पैसे असल्यामुळे त्याने इतकी लग्न केली आहेत. मात्र, हे खरं नाही. या व्यक्तीच्या सर्व बायका लहान-मोठे व्यवसाय करून पैसे कमावतात. ऑन्गने आपल्या बायकांना सांगितलेलं आहे की माझ्यापासून कधीही काही लपवू नका. जर त्यांना दुसरा पुरुष आवडला, तरीही स्पष्टपणे सांगण्यास ऑन्गने त्यांना सांगितलं आहे. यासोबतच कोणाला घटस्फोट हवा असेल, तरीही स्पष्टपणे सांगा, असंही तो म्हटलेला आहे. सुरुवातीला ऑन्गने इतकी लग्न केल्याने त्याच्या बायका आणि घरचेही चिंतेत होते मात्र आता त्याच्या चांगल्या स्वभावामुळे सगळेच आनंदी आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.