जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मसाज पार्लरमध्ये जाऊन भलतंच काम करायचा महिलेचा पती; या गोष्टीमुळे झाला खुलासा

मसाज पार्लरमध्ये जाऊन भलतंच काम करायचा महिलेचा पती; या गोष्टीमुळे झाला खुलासा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

महिलेचं असं म्हणणं आहे, की तिचा पती सतत एका लायसेंस्ड मसाज पार्लरमध्ये जात असे. सतत तिथे जाऊन त्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 13 जानेवारी : कोणत्याही नात्यात प्रेम आणि विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. नात्यात एकानेही धोका दिला (Cheating in Love) तर ते जास्त दिवस टिकत नाही. सोशल मीडियावर एका महिलेनं आपल्या पतीने दिलेल्या अशाच एका धोक्याची स्टोरी शेअर केली आहे. महिलेनं आपली ओळख लपवली आहे. महिलेचा दावा आहे, की तिच्या पतीने मसाज पार्लरमध्ये (Massage Parlour) जाऊन तिचा विश्वासघात केला. याचा पुरावा या व्यक्तीला झालेला STI म्हणजेच सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Disease) होता. अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अन् लागलं लॉकडाऊन; तरुणीसोबत पुढे घडलं अनपेक्षित घटना कॅनडाच्या रिचमंड येथील आहे. महिलेचं असं म्हणणं आहे, की तिचा पती सतत एका लायसेंस्ड मसाज पार्लरमध्ये जात असे. सतत तिथे जाऊन त्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज झाला. या आजारामुळे महिलेला समजलं की तिचा पती तिथे केवळ मसाज करण्यासाठी जात नसे. सुदैवाने महिला या आजाराने ग्रस्त झाली नाही. मात्र, सत्य समोर आल्यानंतर तिने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला महिलेनं या घटनेची कॅनडाच्या एका रिचमंड न्यूजमध्ये माहिती दिली. महिलेनं सांगितलं की याबाबत तिने जेव्हा पतीला विचारलं तेव्हा त्याने निर्लज्जपणे हे सर्व केल्याचं मान्य केलं. सोबतच घटस्फोटाबद्दल ऐकूनही त्याने इथून पुढेही पार्लरमध्ये जाणार असल्याचं सांगितलं. मात्र घटस्फोट देण्याआधी महिलेला या गोष्टीची खात्री करून घ्यायची असल्याने ती पतीचा फोटो घेऊन मसाज पार्लरमध्ये गेली. GF च्या लग्नात BF ची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं; पुढे काय घडलं पाहा VIDEO पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलांनी तिला सांगितलं की तिचा पती इथे येत असे. मात्र जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा या पार्लरमध्ये छापेमारी केली गेली. पार्लरला केवळ मसाजसाठी लायसन्स देण्यात आलं होतं. याआधीही हे पार्लर मार्च 2020 मध्ये वादात अडकलं होतं. तेव्हा एका वेबसाईटवर या पार्लरसाठी सेक्स वर्कर्सची व्हॅकेन्सी काढण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात