Home /News /viral /

अनोळखी व्यक्तीसोबत पहिल्यांदाच डेटवर गेली अन् लागलं लॉकडाऊन; तरुणीसोबत पुढे घडलं अनपेक्षित

अनोळखी व्यक्तीसोबत पहिल्यांदाच डेटवर गेली अन् लागलं लॉकडाऊन; तरुणीसोबत पुढे घडलं अनपेक्षित

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

वांगने सांगितलं की घरचे लोक तिच्यासाठी लग्नाकरता मुलगा शोधत आहेत. त्यांनी वांगसाठी दहा मुलं पाहून ठेवली होती. त्याच मुलांना भेटण्यासाठी वांग या शहरात आली होती.

    नवी दिल्ली 13 जानेवारी : एक महिला पहिल्यांदाच एका अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर (First Date) गेली होती. मात्र, तेव्हाच तिथे लॉकडाऊन (Lockdown) लागलं आणि तिला याच अनोळखी व्यक्तीसोबत राहावं लागलं. ही घटना चीनच्या झेंगझॉ शगरातील आहे. वांग नावाची ही महिला मागील बुधवारी एका अनोळखी व्यक्तीच्या घरी, त्याला भेटण्यासाठी गेली होती. मात्र, तेव्हाच शहरात लॉकडाऊन लागल्याची बातमी समोर आली आणि ही महिला तिथे अडकली. वांग हिने मंगळवारी शंघाईच्या द पेपरला सांगितलं की की जेव्ही ती झेंगझॉ इथे पोहोचली, तेव्हा अचानक लॉकडाऊन लागलं. कोणालाही कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. या कारणामुळे तिला त्याच व्यक्तीच्या घरात राहावं लागलं. वांगने सांगितलं की घरचे लोक तिच्यासाठी लग्नाकरता मुलगा शोधत आहेत. त्यांनी वांगसाठी दहा मुलं पाहून ठेवली होती. त्याच मुलांना भेटण्यासाठी वांग या शहरात आली होती. VIDEO: तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी युवकाचं विचित्र कृत्य; जिममध्येच झाली फजिती या मुलांमधील एका मुलाला वांगला आपले कुकिंग स्किल्स (Cooking Skills) दाखवायचे होते. यासाठी त्याने तिला आपल्या घरीच डिनरसाठी बोलावलं. मात्र अचानक लॉकडाऊन लागल्याने वांगला याच व्यक्तीच्या घरी थांबावं लागलं. तिने या सर्व दिवसांचे छोटे-छोटे व्हिडिओही बनवले. यात तिने दाखवलं की कशाप्रकारे हा व्यक्ती तिच्यासाठी जेवण बनवतो, घरातील काम करतो आणि जेव्हा वांग झोपते, तेव्हा लॅपटॉपवर आपलं काम करत बसतो. वांगने सांगितलं की तिला लग्नासाठी असा पार्टनर हवा आहे, जो तिच्यासोबत भरपूर बोलेल. मात्र या व्यक्ती खूपच कमी बोलतो. पण याशिवाय तो इतर सर्व बाबींमध्ये परफेक्ट आहे. वांगने म्हटलं की तो जेवण ठीक-ठाकच बनवतो, मात्र त्याला जेवण बनवण्याची भरपूर आवडत आहे आणि हीच गोष्ट मला खूप आवडली. 'आई काम करते, जेवणं झाली तर निघा घरी', पोराने वडिलांच्या मित्रांना सुनावले,VIDEO ट्विटरवर वांगने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो 60 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. मात्र नंतर वांगने हा व्हिडिओ डिलीट केला. तिने सांगितलं की हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या व्यक्तीचे मित्र त्याला सतत फोन करत होते, यामुळे त्याच्या खासगी आयुष्यावर याचा परिणाम होत होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dating app, Lockdown

    पुढील बातम्या