Home /News /viral /

गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंडची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं आणि...; पुढे काय घडलं तुमही पाहा VIDEO

गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंडची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं आणि...; पुढे काय घडलं तुमही पाहा VIDEO

गर्लफ्रेंडच्या लग्नात बॉयफ्रेंड आल्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून प्रत्येक जण हैराण झाला.

  मुंबई, 13 जानेवारी : गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत लग्न करत असताना मध्येच बॉयफ्रेंडची एंट्री होते (Boyfriend in girlfriend wedding video). हा धक्का कमी की काय मग तो सर्वांसमोर आपल्या गर्लफ्रेंडसोबत असं काहीतरी करतो की पाहून सर्वजण शॉक होतात. एखाद्या फिल्ममध्ये आपण पाहतो असा हा सीन. पण सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral video) होतो आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या लग्नात अचानक एंट्री घेतली. इतकंच नव्हे तर तिच्यासमोर स्टेजवरही आला. नवरदेवाला बाजूला करत त्याने सर्वांसमोर तिला प्रपोज केलं. त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून प्रत्येक जण हैराण झाला. अगदी तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहून शॉक व्हाल. बरं आधी तुम्ही सांगा की अशी परिस्थिती असेल तर नेमकं काय होईल. सर्वात आधी तर त्या तरुणाची धुलाई केली जाईल. जर त्या नवरीबाईने त्या तरुणाची साथ दिली तर ती त्याच्यासोबत पळून जाईल, वरपक्ष हंगामा करेल, असं बरंच काही नकारात्मक घडू शकतं. पण हा व्हिडीओ पाहिला तर यापैकी इथं काहीच झालं नाही. अगदी याच्या उलट घडलं आहे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. हे वाचा - VIDEO - पाठवणीवेळी नवरीने पसरलं भोकाड; गाडीत नवरदेवाने असं काही केलं की आवाज बंद व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर एकत्र उभे आहेत. नवरदेवाने आपल्या हातात गुलाब घेतला आहे आणि तिथं असलेले लोक त्याला नवरीला प्रपोज करायला सांगत आहेत. तेव्हा अचानक एक तरुण स्टेजवर येतो. तो नवरीसमोर आपल्या गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो. त्यावेळी तिथं उपस्थित प्रत्येक जण थक्क होतं.
  नवरीबाईच नाही तर अगदी नवरदेवही घाबरलेला दिसतो आहे. तो हसत हसत गुपचूप मागे होतो. त्यानंतर नवरीबाई त्याच्याकडे पाहते त्यावेळी नवरदेव तिला तरुणाचं प्रपोज स्वीकार असाच इशारा करतानाही दिसतो. हे वाचा - लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Boyfriend, Girlfriend, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या