मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजबच! शिक्षिकेनं एका वर्षात दिला 4 बाळांना जन्म; नेमकं कसं शक्य झालं?

अजबच! शिक्षिकेनं एका वर्षात दिला 4 बाळांना जन्म; नेमकं कसं शक्य झालं?

एका प्रायमरी स्कूल टीचरनं एका वर्षाहून कमी काळात 4 बाळांना जन्म दिला आहे. ही महिला लॉकडाऊनच्या काळात दोन वेळा गर्भवती झाली आणि एका वर्षाच्या आतच तिनं चार बाळांना जन्म दिला (Woman Gave Birth to 4 Babies in One Year)

नवी दिल्ली 04 ऑगस्ट : एक अनोखं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका प्रायमरी स्कूल टीचरनं एका वर्षाहून कमी काळात 4 बाळांना जन्म दिला आहे. ही महिला लॉकडाऊनच्या काळात दोन वेळा गर्भवती झाली आणि एका वर्षाच्या आतच तिनं चार बाळांना जन्म दिला (Woman Gave Birth to 4 Babies in One Year). सर्व बाळं आणि आई पूर्णपणे सुरक्षित आहे. ही घटना इंग्लंडच्या शेफील्ड (Sheffield) येथील आहे.

साऊथ यॉर्कशायरच्या शेफील्डमध्ये राहणारी 31 वर्षीय जेसिका प्रिचर्ड (Jessica Pritchard) हिनं मे 2020 मध्ये मुलगी मिया हिला जन्म दिला आणि यानंतर बरोबर अकरा महिन्यांनंतर त्याच वर्षी एप्रिल महिन्यात तिनं तिळ्या बाळांना जन्म दिला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेसिकानं सांगितलं, की एकसोबतच जन्मलेले एला, जॉर्ज आणि ओलिविया एकदम निरोगी आहेत. मात्र, त्यांचं वजन अतिशय़ कमी आहे.

VIDEO - ...अन् इवल्याशा कुत्र्याला घाबरला अवाढव्य रेडा; पाठलाग सोडून ठोकली धूम

जेसिकानं सांगितलं, की मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिला ती गरोदर असल्याचं समजलं, त्यावेळी ती मेटरनिटी लिव्हवर होती. तिन्ही मुलांचा जन्म केवळ 31 आठवडे, म्हणजेच साडेसात महिन्यांतच झाला होता. यामुळे तिघांनाही तब्बल दोन महिने रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं आणि मागील महिन्यात त्यांना घरी आणण्यात आलं आहे. जेसिकाची एक आठ वर्षांची मुलगीही आहे आणि आता एका वर्षातच तिनं 4 बाळांना जन्म दिला आहे. या घटनेनं तिचा पार्टनर हॅरी विलियम्स अवाक झाला आहे. कारण एकसोबतच तिन मुलं होतील, असं त्यांना वाटलं नव्हतं.

'उन्हें मत बताना...'! किल्ल्यातून येणाऱ्या त्या आवाजाचं अजब कारण ऐकून उडेल थरकाप

जेसिकानं सांगितलं, की कधी कधी चार बाळांना एकसोबतच सांभाळणं अतिशय कठीण वाटतं. कारण सर्वांना सोबतच भूक लागते. यासोबत दिवसातला जास्त वेळ त्यांचे डायपर बदलण्यातच जातो.

First published:

Tags: Pregnant woman, Small baby, Viral news