मुंबई, 04 ऑगस्ट : रेडा किंवा बैलाशी (Bull) पंगा घेणं किती महागात पडते हे आपल्याला माहितीच (Bull attack video) आहे. चवताळलेल्या अशा बैलाचे, रेड्याचे (Bull video) तुम्ही व्हिडीओ पाहिले असतील. पण आता आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहेत (Dog and bull video). ज्यात जो रेडा पाहून भल्याभल्यांची घाबरगुंडी उडतो तोच रेडा एका छोट्याशा कुत्र्याला घाबरला आहे (Bull fear dog).
कुत्र्याचा पाठलाग करणाऱ्या रेडा (Bull attack on dog) त्या कुत्र्यालाच पाहून पळाला आहे (Bull running away from dog). कुत्र्याने या रेड्याला सरो की परो करून सोडलं (Dog attack on bull). सोशली मीडियावर (Social media) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. तुम्हाला फक्त वाचून विश्वास बसणार नाही. तर हा व्हिडीओ आधी पाहा.
“Don’t you try!” 😂 pic.twitter.com/LtP0e5t0PE
— Buitengebieden (@buitengebieden_) August 1, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक क्युट छोटासा कुत्रा आपल्या मार्गाने हळूहळू चालत जात आहे. एक अवाढव्य रेडा त्याचा पाठलाग करत आहे. आपल्याच विश्वासत रमत चालणाऱ्या कुत्र्याला आपला कुणीतरी पाठलाग करत आहे, याची कल्पनाही नाही. रेडा हळूहळू कुत्र्याच्या मागे येतो आणि तो त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
हे वाचा - आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
इतक्यात आपल्या मागे कुणीतरी आहे, याची जाणीव कुत्र्याला होते. तो सावध होतो आणि मागे वळतो. पाहतो तर काय इतका मोठा बैल. पण शरीराने मोठा असला म्हणून काय झाला कुत्रा त्याला पाहून घाबरला नाही. तर तो थेट बैलाच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला आणि उलट त्यानेच त्याचा पाठलाग केला.
खरंतर रेडा कुत्र्यावर हल्ला करायला आला होता. पण कुत्र्यानेच त्याच्यावर पलटवार केला. एका क्षणात त्याने बाजी पलटली. रेड्याच्या मागे धावून त्याचा पाठलाग केला आणि मग काय कुत्र्याचं हे रूप पाहून रेड्याने कुत्र्यावर हल्ला करणं दूर तो आपला जीव वाचण्यासाठी पळू लागला. त्याने तिथून धूमच ठोकली. ज्या पावलाने तो हळूहळू आला त्याच पावलाने तो सुसाट पळत सुटला.
हे वाचा - VIDEO: चवताळला रेडा, प्रवाशांसह शिंगावरच घेतली कार; पुढे जे घडलं ते पाहून हादराल
Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कुत्र्याच्या हिमतीला दाद दिली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bull attack, Dog, Other animal, Pet animal, Viral, Viral videos, Wild animal