Home /News /viral /

'उन्हें मत बताना...'! किल्ल्यातून येणाऱ्या त्या आवाजाचं स्थानिकांनी सांगितलं अजब कारण, ऐकून उडेल थरकाप

'उन्हें मत बताना...'! किल्ल्यातून येणाऱ्या त्या आवाजाचं स्थानिकांनी सांगितलं अजब कारण, ऐकून उडेल थरकाप

काही लोकांनी असा दावा केला आहे, की जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा तिथे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असल्याचा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना असं जाणवलं की एक लहान मुलगी काहीतरी बोलत आहे

    लंडन 04 ऑगस्ट : भूतांच्या (Ghost) अनेक कथा आजपर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, तुम्हाला कधी आपल्या आसपास निगेटिव्ह एनर्जी (Negative Energy) असल्याचं जाणवतं का? विचार करा, की तुम्ही एखाद्या जुन्या किल्ल्यामध्ये किंवा वाड्यात फिरण्यासाठी गेला आहात. तिथे एकदम अंधार आहे आणि अचानक तुमच्या कानावर असा आवाज पडतो, की 'उन्हें मत बताना...' तर? हा अनुभव कोणासााठीही नक्कीच भीतीदायक असेल. मात्र, अशीच एक घटना ब्रिटनच्या (Britain) एका किल्ल्यामध्ये घडल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की एका किल्ल्यात त्यांना अशीच भीतीदायक आवाज ऐकू आले आहेत. ब्रिटनच्या नॉर्थ नेल्समध्ये कॉन्वी कॅसल (Conwy Castle)आहे. याला UNESCO नं वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं आहे. स्थानिक नागरिकांचा असा दावा आहे, की इथे एका साधूचा आत्मा राहतो. आता लोकांना तिथे इतरही काही विचित्र अनुभव येत आहेत. Mirror.co.uk नं दिलेल्या वृत्तानुसार, आता कॅसलच्या आतमध्ये एका मुलीचाही आवाज ऐकू येऊ लागला आहे. स्टेजवरच नवरीनं केलं असं काही की लाजला नवरदेव; कपलचा Romantic Video व्हायरल काही लोकांनी असा दावा केला आहे, की जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा तिथे काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असल्याचा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना असं जाणवलं की एक लहान मुलगी काहीतरी बोलत आहे. जेव्हा लक्ष देऊन हा आवाज ऐकला गेला, तेव्हा समजलं की ती 'उन्हें मत बताना' असं बोलत होती. एका व्यक्तीनं हा आवाज रेकॉर्ड केला असल्याचा दावाही केला. यानंतर लोकांनी तिथून पळ काढला. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या किल्ल्याची निर्मिती 1283 ते 1287 या काळात झाली आहे. नंतर 16 व्या शतकात किंग हेनरी 8 यानं हा किल्ला तुरुंग म्हणून वापरण्यास सुरुवात केली. याठिकाणी कैद्यावर अत्याचार केले गेले आणि इथेच अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे ही अतिशय भीतीदायक जागा असल्याचं मानलं जातं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Horror, Viral news

    पुढील बातम्या