Home /News /viral /

लग्नाआधीच महिलेला समजलं होणाऱ्या पतीबद्दलचं धक्कादायक सत्य; रागात उचललं हे पाऊल

लग्नाआधीच महिलेला समजलं होणाऱ्या पतीबद्दलचं धक्कादायक सत्य; रागात उचललं हे पाऊल

या महिलेचं काहीच दिवसात लग्न होणार होतं. ती अतिशय उत्साही होती. मात्र अचानक लग्नाआधीच तिला समजलं की तिच्या पतीचं तिच्या मुलाच्या गॉडमदरसोबत अफेअर सुरू आहे

  नवी दिल्ली 18 जानेवारी : नवरी आणि नवरदेवासाठी (Bride and Groom) लग्नाआधीचे काही दिवस अतिशय खास असतात. दोघंही लग्नासाठीची तयारी अगदी उत्साहात करत असतात. कपड्यांपासून इतर सर्वच गोष्टी मॅनेज करण्यासाठी काही दिवस लागतात. मात्र, याच काळात आपल्या होणाऱ्या जोडीदाराबाबत काही हैराण करणाऱ्या गोष्टी समजल्यास निश्चितच कोणालाही धक्का बसतो. नुकतंच स्कॉटलँडमधील एका महिलेसोबतही असंच झालं. तिला आपल्या होणाऱ्या पतीबद्दल लग्नाआधीच एक धक्कादायक गोष्ट समजली. या महिलेचं काहीच दिवसात लग्न होणार होतं. ती अतिशय उत्साही होती. मात्र अचानक लग्नाआधीच तिला समजलं की तिच्या पतीचं तिच्या मुलाच्या गॉडमदरसोबत अफेअर सुरू आहे (Bride Catches Groom Cheating with Son’s Godmother). गॉडमदर म्हणजे ती महिला असते, जी आपल्या मैत्रिणीच्या किंवा नातेवाईकाच्या मुलांची आईप्रमाणे काळजी घेते. OMG! पळता पळता अचानक हवेतच उडू लागलं हरिण; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत VIDEO ही बाब समजताच महिलेनं रागात आपला वेडिंग ड्रेस (Wedding Dress) विकण्यासाठी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, की मी कधीही हा ड्रेस घातला नाही. कारण माझा होणारा पती माझ्या मुलाच्या गॉडमदरसोबत रिलेशनमध्ये होता. यामुळे मी लग्न मोडलं. महिलेनं सांगितलं, की तिने हा ड्रेस 50 हजार रुपयांत खरेदी केला होता. महिलेनं सांगितलं की आता हा ड्रेस विकून त्याच्याबद्दलच्या सगळ्या आठवणी तिला आपल्या आयुष्यातून मिटवून टाकायच्या आहेत. महिलेनं आपला ड्रेस कमी किमतीतच विकण्याचा निर्णय घेतला. कारण सध्या तिला कोणत्याही परिस्थितीत हा ड्रेस आपल्या जवळ ठेवायचा नाही. महिलेनं म्हटलं, की तिने आपलं लग्नही मोडलं आहे आणि आता तिला या व्यक्तीसोबत काहीही संबंध ठेवायचे नाहीत.

  Wedding cake मुळे चढला नवरीबाईचा पारा; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मागितला घटस्फोट

  या पोस्टवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की कदाचित या महिलेचा ड्रेसच अशुभ आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं, तिचं लग्न झालं असतं तर हा ड्रेस तिला खूप सुंदर दिसला असता, मात्र ती या व्यक्तीसोबत आनंदी राहिली नसती. त्यामुळे महिलेनं लग्न अशा व्यक्तीसोबत झालं नाही, हे बरं झालं. रेडिटवर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Shocking news

  पुढील बातम्या