Home /News /viral /

Wedding cake मुळे चढला नवरीबाईचा पारा; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मागितला घटस्फोट

Wedding cake मुळे चढला नवरीबाईचा पारा; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मागितला घटस्फोट

लग्नाच्या केकवरून नवरदेवाने नवरीबाईसोबत जी मस्ती केली ती चांगली महागात पडली आहे.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी :  नवरा-बायको म्हटलं की भांडणं आलीच. लग्नानंतर काही दिवस अगदी आनंदात जातात पण त्यानंतर दाम्पत्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडतात. वाद होतात, भांडणं होतात आणि काही वेळा तर प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतं. सध्या अशाच एका घटस्फोटाचं प्रकरण सोशल मीडियावर पोहोचलं आहे. ज्यात नवरीबाईने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाकडून घटस्फोट मागितला आहे (Bride demand divorce after wedding) आणि याचं कारण आहे ते म्हणजे वेडिंग केक (Wedding cake). लग्नाच्या केकमुळे नवरीबाईच्या रागाचा पारा इतका चढला की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिने आपल्या नवऱ्याला आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं सांगितलं (Bride demand divorce due to wedding cake). आता तुम्ही म्हणाल की लग्नाचा केक कसा काय घटस्फोटासाठी कारणीभूत ठरू शकतो, हे काय घटस्फोटाचं कारण आहे. लग्नाच्या केकवरून नवरदेवाने नवरीबाईसोबत जी मस्ती केली ती चांगली महागात पडली आहे. तिच्या नवऱ्याने लग्नात तिच्या मनाविरुद्ध असं काही केलं जे तिला अपमानास्पद वाटलं. आता तिला आपल्या नवऱ्यासोबच राहायचं नाही. हे वाचा - जावयाचा असा पाहुणचार; VIDEO पाहून म्हणाल, 'असं सासर आपल्यालाही हवं राव' महिलेने एका ऑनलाइन प्लटफॉर्मवर (Slate’s Dear Prudence advice column) आपल्या लग्नाचा अनुभव मांडला आहे.  महिलेने सांगितलं, लग्नाच्या दिवशी केक कापला जात होता. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर कुणी केक लावू नये, असं तिला वाटत होतं. केकमुळे आपला चेहरा बिलकुल खराब होऊ नये, असं तिला वाटत होतं. तिच्या नवऱ्यालासुद्धा हे माहिती होतं. तरीसुद्धा तिच्या नवऱ्याने तीच चूक केली. त्याने तिच्या चेहऱ्याला केक लावला नाही तर तिचं तोंडच केकमध्ये घुसवलं (Groom smashed bride’s head into cake). ज्यामुळे तिचा चेहरा खराब झाला. महिलेने आपल्या बॉयफ्रेंडशीच लग्न केलं होतं. त्याने मुद्दामहून असं केल्याने तिला जास्त राग आला. तिच्या नवऱ्याने यासाठी वेगळ्या कप केकची सोय केली होती, म्हणजे हे करायचं हे आधीपासूनच त्याने ठरवलं होतं. आपल्याला आता आपल्या नवऱ्यासोबत राहायचं नाही, हे तिने स्पष्टपणे सांगितलं. ख्रिसमसच्या कालावधीत झालेलं हे लग्न ती आता जानेवारीच्या अखेरपर्यंत संपवण्याच्या तयारीत आहे. हे वाचा - लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; रागात नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला इतक्या छोट्याशा गोष्टीला ती मोठं करत आहे. इतक्याशा गोष्टीसाठी लग्न मोडू नये, असं तिचं कुटुंब तिला सांगत आहे. दरम्यान नेटिझन्सनी मात्र नवरदेवाला चुकीचं ठरवलं आहे आणि या महिलेला तिचा निर्णय तिनेच घ्यावा असा सल्ला दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Viral, Wedding, Wedding cake, Wife and husband

    पुढील बातम्या