• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दरवाजा उघडताच कारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था

दरवाजा उघडताच कारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था

अस्वलाला कारमध्ये पाहून (Woman Finds Bear Inside Her Car) महिलेनं असं काही केलं जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होताना दिसतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहूनच आपण हैराण होतो. तर, काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात. सध्या सोसल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की अस्वलाला कारमध्ये पाहून (Woman Finds Bear Inside Her Car) महिलेनं असं काही केलं जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL आपल्या सर्वांना माहिती आहे, की जंगलातील बहुतेक प्राणी हे आपल्याच नादात मग्न असतात. मात्र, अनेकदा हे प्राणीही असं काही करतात जे पाहून हसू आवरणं अशक्य होतं. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात दिसतं, की अचानक एका कारमधून अस्वल बाहेर येतं. हे पाहून महिला जोरात ओरडते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिला फळांनी भरलेली एक टोकरी घेऊन गाडीमध्ये बसण्यासाठी जाते. ती जेव्हा कारचा दरवाजा उघडते तेव्हा आतमधून एक अस्वल बाहेर येतं. हे पाहून महिला प्रचंड घाबरते आणि हातातील फळं फेकून तिथून पळ काढते. 29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की महिलेला अशा पद्धतीनं ओरडताना पाहून अस्वलही घाबरलं असेल. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की या मजेशीर व्हिडिओनं माझा दिवसच चांगला बनवला. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ @ijayt205 नावाच्या यूजरनं ट्विटरवर (Twitter Video) शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 3.8 मिलियन म्हणजेच 38 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: