• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता या कारणामुळे स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी

29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता या कारणामुळे स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी

अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच तुरुंग फोडून डार्को फरार झाला. पोलिसांनी (Police) भरपूर शोध घेतला मात्र 29 वर्षांपासून डार्कोचा तपास लागला नव्हता.

 • Share this:
  नवी दिल्ली 21 सप्टेंबर : एक ऑस्ट्रेलियन (Australia) कैदी 29 वर्षांपूर्वी न्यू साऊथ वेल्सच्या ग्रॅफ्टन करेक्शनल सेंटरमधून (Grafton Correctional Centre) गायब झाला होता. यानंतर या व्यक्तीचा काहीही तपास लागला नाही. पोलिसांनीही आशा सोडून दिली आणि त्याला शोधणं बंद केलं. मात्र, 29 वर्षांनंतर या कैदीनं स्वतःच पोलिसांकडे येत आपल्याला अटक करण्याची मागणी केली. डार्को डॉगी डेसिक नावाच्या व्यक्तीला अफू लावल्याच्या गुन्ह्यात 13 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच तुरुंग फोडून डार्को फरार झाला. पोलिसांनी (Police) भरपूर शोध घेतला मात्र 29 वर्षांपासून डार्कोचा तपास लागला नव्हता. अखेरीस, कोरोना व्हायरसच्या (Coronavirus ) काळात जेव्हा त्याला राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा नव्हती तेव्हा तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आला. या घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार युगोस्लाव्हिया येथे जन्मलेला डार्को डॉगी डेसिक (Darko Dougie Desic) हा निर्वासित आहे. तो तुरुंगातून पळून गेला आणि सिडनीच्या उत्तर किनारपट्टीवर पोहोचला. येथे तो वर्षानुवर्षे मजूर आणि मेकॅनिक म्हणून काम करत राहिला. या काळात तो स्वत: ला खूप वाचवत असे. त्याला जिथे जायचे असे तिथे तो पायीच जायचा. 29 वर्षे तो ना डॉक्टरकडे गेला, ना कोणत्याही दंतवैद्याकडे. पकडलं जाण्याच्या भीतीनं तो अत्यंत साधं आयुष्य जगत होता. या दरम्यान, 20 वर्षांपासून निर्वासित असल्यामुळे इमिग्रेशन अधिकारीदेखील त्याचा शोध घेत होते. 2008 मध्ये त्याला निवासस्थानही देण्यात आलं. मात्र, त्याला कोणीही शोधू शकलं नाही. कोरोना आल्यावर रोजंदारीवर काम करणाऱ्या डार्कोच्या अडचणी वाढल्या. ना रोजगार शिल्लक होता, ना राहायला जागा. अशा परिस्थितीत त्याला शरण येण्याशिवाय पर्याय उरला नाही. अखेरीस डार्को पोलीस ठाण्यात गेला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. कोठडीतून पळून जाण्यासाठी त्याला जामिनाशिवाय तुरुंगवासाची शिक्षा झाली. डार्को तुरुंगातून पळून गेला कारण आपल्याला परत युगोस्लाव्हियाला प्रत्यार्पण केलं जाईल अशी त्याला भीती होती आणि तिथे जाण्याची त्याची इच्छा नव्हती. अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि...; पाहा धक्कादायक VIDEO आता तो राहत असलेल्या समाजातील लोक त्याच्या सुटकेची मागणी करत आहेत. बेली हिंगीस ही नॉर्दर्न बीचेसच्या एका व्यावसायिकाची मुलगी डार्कोसाठी निधी गोळा करत असून तिनं त्याच्यासाठी वकिलाची व्यवस्था केली आहे. हे लोक म्हणतात की तो खूप मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहे आणि त्याला मुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: