जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL

सासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL

सासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात सासरी आलेल्या नव्या नवरीला तिचा दीर (Devar Bhabhi Video) काठीनं मारताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 सप्टेंबर : लग्नानंतर (Marriage) जेव्हा नवरी पहिल्यांदा सासरी येते तेव्हा केवळ कुटुंबीयच नाही तर आसपासचे लोकही तिच्या स्वागतासाठी हजर राहतात. नवरी ही घरात आलेली लक्ष्मी असते असं म्हटलं जातं. कारण तिच्या येण्यानं घरातील लोकांचा आनंद आणखीच वाढतो. मात्र, काही ठिकाणी लग्नानंतर अशाही काही प्रथा परंपरा असतात ज्या पाहून सगळेच हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात सासरी आलेल्या नव्या नवरीला तिचा दीर (Devar Bhabhi Video) काठीनं मारताना दिसत आहे. 29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र (Weird) वाटलं असेल मात्र अनेक ठिकाणी लग्नानंतर हा खेळ खेळला जातो. या परंपरेनुसार, जेव्हा नवरीबाई पहिल्यांदा आपल्या सासरी येते तेव्हा तेव्हा नवरी असलेल्या वहिनी आणि दिराला काठीनं एकमेकांची धुलाई करावी लागते. मात्र, मस्करीत अनेकदा लोक एकमेकांना जोरजोरातही मारू लागतात. असंच काहीसं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. यात दिसतं, की लग्नानंतर सासरी पोहोचलेली नवरीबाई परंपरेनुसार दिरासोबत हा खेळ खेळत आहे. मस्करीत हा दीर आपल्या वहिनीला जोरजोरात मारू लागतो. इतक्यात शेजारी उभा असलेली नवरदेवाची आई त्याला थांबवते.

जाहिरात

दारू पिऊन महिलेचं पोटच्या मुलीसोबत अमानुष कृत्य; गाडीसोबत फरफटत नेलं अन्… वहिनी आणि दीर यांचं हे अनोखं नातं नेहमीच सर्वांचं मन जिंकत असतं. या नात्यात प्रेम, आपुलकी, रुसवा आणि मस्करी हे सर्वच असतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दीर आणि वहिनीचा व्हिडिओही नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर जान्हवी डॉल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की लग्नातील या सुंदर खेळाचं काय नाव आहे? या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात