जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पहिल्याच भेटीत महिलेसोबत रोमान्स करून गायब झाला व्यक्ती; मग सोशल मीडियामुळे उघड झालं धक्कादायक सत्य

पहिल्याच भेटीत महिलेसोबत रोमान्स करून गायब झाला व्यक्ती; मग सोशल मीडियामुळे उघड झालं धक्कादायक सत्य

पहिल्याच भेटीत महिलेसोबत रोमान्स करून गायब झाला व्यक्ती; मग सोशल मीडियामुळे उघड झालं धक्कादायक सत्य

मायका या व्यक्तीचा शोध घेऊ लागली. त्याचं नावही तिला माहिती नव्हतं. मायकाकडे केवळ या व्यक्तीसोबतचे काही फोटो होते. तिने हेच फोटो टिकटॉकवर अपलोड केले

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 जानेवारी : इंटरनेटचं जग अतिशय मोठं आणि वेगवान आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सचा (Social Networking Sites) वापर वाढल्यापासून जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक घडामोडी अगदी सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. एका महिलेनं याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्यासोबत रोमान्स करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला शोधून काढलं (Romance With Unknown Man). महिला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या व्यक्तीला भेटली होती. याच काळात ती या व्यक्तीच्या जवळ आली. मात्र यानंतर हा व्यक्ती गायब झाला. महिलेकडे त्याचा एक फोटो होता. हा फोटो तिने इंटरनेटवर पोस्ट केला. या फोटोमुळे हा व्यक्ती तर मिळाला, पण यासोबतच एक खुलासाही झाला. गर्लफ्रेंडसाठी घेतली 4 कोटीची अंगठी पण…; तिचं सत्य समोर येताच हादरला तरुण टिकटॉकवर मायका रेने नावाच्या महिलेनं या व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माईका फ्लोरिडाच्या मियामी येथी सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी गेली होती. यादरम्यान बीचवरच तिची भेट एका व्यक्तीसोबत झाली. दोघांचंही एकमेकांसोबत बोलणं झालं आणि यानंतर त्यांनी काही खास क्षण एकमेकांसोबत घालवले. यानंतर या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर मायकाला दिला आणि तो तिथून निघून गेला. मात्र, मायकाकडून त्याचा नंबर हरवला. मायका या व्यक्तीचा शोध घेऊ लागली. त्याचं नावही तिला माहिती नव्हतं. मायकाकडे केवळ या व्यक्तीसोबतचे काही फोटो होते. तिने हेच फोटो टिकटॉकवर अपलोड केले. सोबतच लोकांना या व्यक्तीला शोधण्यासाठी आपली मदत करण्याची मागणी केली. माहिती म्हणून मायकाने केवळ इतकंच लिहिलं, की हा व्यक्ती डेट्रॉईड येथील रहिवासी आहे. पाहता पाहता तिची ही पोस्ट व्हायरल झाली आणि जवळपास 45 लाख लोकांनी पाहिली. हा व्यक्ती सापडलाही मात्र यात एक ट्विस्ट आला.

रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षीय धडधाकट तरुणाचा अचानक जीव गेला

एका महिलेनं मेसेज करून मायकाला या व्यक्तीबद्दलची माहिती दिली. मात्र ती महिला त्या व्यक्तीची पत्नी निघाली. मायकाने पुढे सांगितलं की महिलेनं आपल्या पतीने दिलेल्या धोक्याची माहिती दिल्याबद्दल मायकाचे आभार मानले. सोबत मायकाकडे हा व्हिडिओ डिलीट न करण्याची मागणी केली. या पोस्टनंतर लोकांनी मायकाचं सांत्वन केलं. मात्र, सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा लोकांसमोर आली. मायकानेही लोकांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात