Home /News /viral /

गर्लफ्रेंडसाठी घेतली 4 कोटीची अंगठी पण...; तिचं सत्य समोर येताच हादरला तरुण

गर्लफ्रेंडसाठी घेतली 4 कोटीची अंगठी पण...; तिचं सत्य समोर येताच हादरला तरुण

25 वर्षीय मोस मेफेयर आपल्या गर्लफ्रेंडसोबत 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

  नवी दिल्ली 20 जानेवारी : रिलेशनशिपमध्ये (Relationship) असताना कपल नेहमी एकमेकांवर प्रामाणिकपणाची आशा करतात. मात्र, विश्वासघात झाल्यास (Cheating in Relationship) हे नातं फार काळ टिकत नाही. एका ब्रिटिश व्यक्तीसोबतही असंच झालं. हा व्यक्ती आपलं 6 महिन्यांचं नातं ऑफिशिअल करण्याच्या तयारीत होता. मात्र, एका महागड्या प्रपोजल रिंगची (Proposal Ring) ऑर्डर दिलेल्या या व्यक्तीसमोर अचानक ते सत्य आलं, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल (Girlfriend Cheated Boyfriend).

  झोपेत बडबडू लागली पत्नी; असं काही म्हणाली की, पतीने थेट केला पोलिसांना फोन!

  Mirror च्या रिपोर्टनुसार, 25 वर्षीय मोस मेफेयर आपल्या गर्लफ्रेंडसोबत 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्याने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने अतिशय सुंदर रिंगसोबत तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याआधीच त्याला आपल्या गर्लफ्रेंडबाबतचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि त्याने काहीही न बोलताच हे नातं तोडलं. 5.5 कॅरेट व्हाईट रेडिएंट कट प्लॅटिनम रिंग घेऊन या तरुणीला प्रपोज करण्याची संपूर्ण तयारी मोस मेफेयरने केली होती. याच्या एक दिवस आधीच त्यांनी आपल्या पार्टनरचं इन्स्टाग्राम आपल्या फोनमध्ये लॉगिन केलं. यावेळी आपल्या गर्लफ्रेंडने एका व्यक्तीला फ्लर्टी मेसेज केल्याचं त्याला दिसलं आणि हे पाहून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. ते दोघंही चॅटमध्ये एकमेकांना भेटण्याबाबत बोलत होते. सगळ्यात शॉकिंग हे होतं, की गर्लफ्रेंडनं मेफेयर आपला एक्स बॉयफ्रेंड असल्याचं या व्यक्तीला सांगितलं होतं. याच चॅटने मेफेयरचे डोळे उघडले आणि त्याने हे नातं तोडलं. Shocking : कंडोममध्ये 'रेड हॉट सॉस' घालून शरीर संबंध; कारण ऐकून धक्काच बसेल! मेफेयरचा असा दावा आहे, की तो आपल्या गर्लफ्रेंडसाठी भरपूर खर्च करत असे. त्याने तिच्यासाठी 4 कोटी रुपयांची रिंगही बनवून घेतली होती. दर महिन्याला तो तिच्यासाठी शॉपिंग करत असे आणि महागडे गिफ्ट तिला देत असे. मात्र, मेफेयरचं असं म्हणणं आहे, की सहा महिन्यांच्या त्यांच्या या नात्यादरम्यानही गर्लफ्रेंड आपल्या एक्सच्या संपर्कात होती आणि याबद्दल मेफेयरला काहीही माहिती नव्हतं. हळूहळू हे प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोहोचलं. मात्र, मेफेयरने आपल्या गर्लफ्रेंडला आपण चॅट वाचलं असल्याचंही सांगितलं नाही आणि तिला पुन्हा संपर्कही केला नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Breakup, Love story

  पुढील बातम्या