Home /News /lifestyle /

रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षांच्या धडधाकट तरुणाचा अचानक जीवच गेला

रात्री गर्लफ्रेंडसोबत करत होता असं काम; 21 वर्षांच्या धडधाकट तरुणाचा अचानक जीवच गेला

तरुणाच्या अचानकपणे झालेल्या या मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला आहे.

    लंडन, 19 जानेवारी : मृत्यू कधी कुणाला कसा गाठेल सांगू शकत नाही. सध्या अशाच एका तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. ज्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला आहे. गर्लफ्रेंडसोबत असताना या मध्यरात्री अचानक या तरुणाचा जीव गेला (Man Dies While Exercising). धडधाकट तरुणाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला (Man died while excercise with girlfriend). यूकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. ब्रिस्टॉलमधील 21 वर्षांचा हेनरी बेस्ट (Henry Best) एक विद्यार्थी होता. तो फिटनेस फ्रिक होता. दिवसभर वेळ मिळाला नाही तर तो मध्यरात्रीही जीममध्ये जायचा आणि वर्कआऊट करायचा. त्याची हीच सवय त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. 10 जानेवारीला रात्री 10 वाजचा तो आपली गर्लफ्रेंड होलीसोबत प्योर जीममध्ये गेला. तिथं तो एक्सरसाइझ करत असताना त्याला चक्कर आली. आपल्याला चक्कर येत असल्याचं त्याने होलीला सांगितलं आणि अचानक धाडकन तो खालीच कोसळला. त्यानंतर होलीने तात्काळ आपात्कालीन क्रमांकावर फोन केला. हे वाचा - सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केली पाठदुखी; मेडिकल रिपोर्ट पाहताच हादरली 10 मिनिटांतच अॅम्ब्युलन्स तिथं आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टर तब्बल एक तास जिममध्ये हेनरीला उटवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर जीममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासण्यात आले. त्याच हेनरी जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं दिसलं.  स्वतःच्या फिटनेसची इतकी काळजी घेणाऱ्या धडधाकट तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. महाराष्ट्रातही डॉक्टरचा जीममध्ये मृत्यू काही दिवसांपूर्वीच सांगलीतील (Sangli) एका डॉक्टरनेही जीममध्ये आपला जीव गमावला (death while exercising) आहे. डॉ. अशोक धोंडे असं मृत पावलेल्या 47 वर्षीय डॉक्टरचं नाव असून ते शल्यचिकित्सक होते. डॉ. धोंडे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले होते. जिममध्ये काही काळ व्यायाम केल्यानंतर त्यांना थकवा जाणवायला सुरू झाला. त्यामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. पण त्यानंतर त्यांना आणखी अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे जिममधील काहीजणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हे वाचा - Shocking : कंडोममध्ये 'रेड हॉट सॉस' घालून शरीर संबंध; कारण ऐकून धक्काच बसेल! रुग्णालयात दाखल करेपर्यंत खूप उशीर झाला होता. याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle, Viral

    पुढील बातम्या