मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: मुलाला पोहायला शिकवताना गेला तोल; अचानक पाण्यात कोसळली महिला, पुढे काय घडलं पाहा

VIDEO: मुलाला पोहायला शिकवताना गेला तोल; अचानक पाण्यात कोसळली महिला, पुढे काय घडलं पाहा

या व्हिडिओमध्ये एक महिला एका लहान मुलाला स्विमिंग पुलमध्ये पोहायला शिकवत असल्याचं दिसतं. मात्र व्हिडिओ पाहून असं जाणवतं की मुलाला पोहायला शिकवण्याआधी, या महिलेलाच आपला तोल सांभाळायला शिकणं अधिक गरजेचं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 जून : अनेकदा अगदी सहज नकळत लोकांसोबत अशा काही दुर्घटना घडतात, ज्या समोरील लोकांनाही थक्क करतात. यात अनेकदा हे अपघात अतिशय गंभीर असतात तर अनेकदा ते मजेशीरही असतात. असाच काहीसा प्रकार एका लहान मुलाला पोहायला शिकवणाऱ्या महिलेसोबत घडला. महिलेसोबत जे काही घडलं त्यानंतर ती स्वतःही हसू लागली आणि हा व्हिडिओ (Funny Video) पाहून आता नेटकरीही पोट धरून हसत आहेत.

वळूने शिंगावर उचलून रस्त्यावर फेकताच बेशुद्ध झाला वृद्ध, मग..; हल्ल्याचा Live Video

अजब आणि विचित्र व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया अकाऊंट व्हायरल हॉगवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो अतिशय मजेशीर आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एका लहान मुलाला स्विमिंग पुलमध्ये पोहायला शिकवत असल्याचं दिसतं. मात्र व्हिडिओ पाहून असं जाणवतं की मुलाला पोहायला शिकवण्याआधी, या महिलेलाच आपला तोल सांभाळायला शिकणं अधिक गरजेचं आहे. महिलेसोबत इथे अशी घटना घडली जी हैराण करणारी आणि मजेशीरही आहे (Woman fell in swimming pool) .

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

व्हिडिओमध्ये दिसतं की, एक वजनदार महिला एका लहान मुलाला पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यास सांगत आहे. जेव्हा मुलगा घाबरतो तेव्हा ती महिला तिचा एक पाय तलावात टाकते आणि मुलाला दाखवते की त्यानेही आपला पाय अशा प्रकारे तलावात टाकावा. मग ती पुलाजवळ बनवलेल्या शिडीकडे सरकते आणि इतक्यात तिचा पाय घसरतो. यानंतर ही महिला थेट स्विमिंग पूलमध्ये पडते. स्विमिंग पूल फार खोल नाही त्यामुळे तिला दुखापत होत नाही. त्यामुळं या घटनेनंतर ती लगेचच हसायला लागते आणि महिला पाण्यात पडल्याचं पाहून हा मुलगाही पाण्यात उतरण्याचं धाडस करतो.

धावत्या रेल्वेसमोर रुळावरून धावत होती दोन मुलं, थरारक व्हिडिओ समोर

व्हिडिओला 44 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. महिला ज्यापद्धतीने खाली कोसळली ते पाहून असं वाटतं की तिला भरपूर गंभीर दुखापतही होऊ शकत होती. मात्र सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. एका यूजरने मजेशीर कमेंट करत म्हटलं, ही महिला इतकी वजनदार होती की तिच्या पडण्यामुळे स्विमिंग पुलमध्येही लाटा उसळल्या. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, की महिलेनं हे कृत्य करून लहान मुलाला एक वाईट उदाहरण दिलं.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media