मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वळूने शिंगावर उचलून रस्त्यावर फेकताच बेशुद्ध झाला वृद्ध, मग..; हल्ल्याचा Live Video

वळूने शिंगावर उचलून रस्त्यावर फेकताच बेशुद्ध झाला वृद्ध, मग..; हल्ल्याचा Live Video

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वळूने व्यक्तीवर असा हल्ला केला की, याचा व्हिडिओ (Bull Attack Video) पाहूनच काळजाचा ठोका चुकेल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 जून : प्राण्यांचे नवनवे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल (Viral Videos of Animals) होत राहतात. यातील बहुतेक व्हिडिओ गोंडस आणि मजेदार असतात. पण, असेही काही व्हिडिओ आहेत जे पाहूनच थरकाप उडतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका वळूने व्यक्तीवर असा हल्ला केला की, याचा व्हिडिओ (Bull Attack Video) पाहूनच काळजाचा ठोका चुकेल.

धावत्या रेल्वेसमोर रुळावरून धावत होती दोन मुलं, थरारक व्हिडिओ समोर

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक वळू रस्त्यावर उभा आहे आणि त्याच्या अंगावर पाणी पडत आहे. समोरच्या घराच्या छतावरून कोणीतरी त्याच्यावर पाणी फेकत असल्याचं दिसतंय. यानंतर बैल तिथून वळतो आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊ लागतो. पलीकडे जात असताना तो अचानक धावू लागतो.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक दुचाकीस्वार आणि एक सायकलस्वार जात असतात, ज्यांच्यावर हल्ला करण्यासाठी वळू त्यांच्या दिशेने धावतो. यामध्ये दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगाने निघून जातो मात्र सायकलवर असलेला एक वृद्ध मागेच राहतो. तो सायकल वेगाने चालवण्याचा प्रयत्न करतो पण अडखळतो, त्यामुळे सायकल चा वेग मंदावतो आणि तोपर्यंत वळू त्याच्यापर्यंत पोहोचतो. यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

Nagpur : बापे रे! वरातीचा घोडा संतापला अन् नवरदेवाचा पायच मोडला; शेवटी स्ट्रेचरवर पडूनच करावं लागलं लग्न, पहा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, वळू वृद्धापर्यंत पोहोचताच, त्याला सायकलसह आपल्या शिंगांवर उचलतो आणि हवेत फेकतो. यानंतर सायकल थोड्या अंतरावर पडते, तर वृद्ध व्यक्ती वळूजवळ पडतो. वळू या व्यक्तीला इतक्यात जोरात धडक देतो की हा व्यक्ती खाली पडताच बेशुद्ध होतो. ही गोष्ट हृदय पिळवटून टाकणारी आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bull attack, Shocking video viral