सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ तर जीवाचा थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दोन मुलं रेल्वे रुळावरून (Railway Track) धावताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे त्याच रुळावरून ट्रेनही येत आहे. हा व्हिडिओ युजर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ भारतातला नसून कॅनडाचा असल्याचं कळतंय. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.
कॅनेडियन ट्रान्सपोर्ट कंपनी मेट्रोलिंक्सच्या (Metrolinx) ट्रेनसमोर दोन अनोळखी मुलं रुळावरून पुढे धावत जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ती ट्रेनकडे पाठ करून रुळांवरून धावताना दिसतात. एक तिसरा मुलगाही रेल्वेपासून दूर बाजूच्या ट्रॅकवर उभा असल्याचं व्हिडिओत दिसतंय. व्हिडिओमध्ये धावत असलेल्या एका मुलाने हलका निळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट पँट घातली आहे. हा व्हिडिओ ट्रेनच्या आतून शूट करण्यात आला असून ही ट्रेन मागे आणि एक मुलगा रुळावरून पुढे धावताना दिसतोय. तर, दुसरा मुलगा जो पांढरा टी-शर्ट आणि शॉर्ट पँट घालून दोन रुळांच्यामध्ये मोकळ्या जागेत धावताना दिसतोय, तो सुरुवातीला त्याच्या मित्रासोबत रुळांवर धावत होता; पण नंतर ट्रेन जवळ येताच तो रुळांपासून दूर गेला.
वेगाने जाणारी ट्रेन या मुलांना धडकणार असं वाटत असतानाच तो रुळावर धावणारा मुलगा खाली रुळाच्या बाहेर निघतो आणि त्याचा जीव वाचवतो. तो मुलगा जर काही सेकंद रुळांवरून उतरला नसता तर त्याच्या जीवाचं काय झालं असतं? असा प्रश्न पडेल इतका थरारक हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
( अतिरिक्त उत्पन्नासाठी महिलेनं सुरू केला ‘हा’ व्यवसाय; आता दरमहा मिळतात 2 लाख रुपये )
मेट्रोलिंक्सने ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. ‘हा थरारक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रेल्वे रुळावर चालण्याचे धोके लक्षात येतील. टोरंटोमधील रेल्वे ब्रिज क्रॉस करताना ही मुलं रेल्वेसमोर आली. अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचलाय, नाहीतर ती गंभीर जखमी झाली असती किंवा त्यांचा जीवही जाऊ शकला असता. त्यामुळे तुमच्या मुलांना रेल्वे सुरक्षेबद्दल (Railway Safety) माहिती द्या,’ असं कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आलंय.
⚠️ This heart-stopping video shows the dangers of walking on railways. Watch as young people come within a foot of serious injury or death while trespassing on a rail bridge in Toronto.
— Metrolinx (@Metrolinx) May 30, 2022
Talk to your kids about rail safety. Resources here: https://t.co/X5uS2ewqui #MetrolinxFYI pic.twitter.com/R8P6dmDFdW
ट्विटरवर हा व्हिडिओ 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. जीव धोक्यात घालून अशा रितीने रेल्वे रुळावर धावणाऱ्या या मुलांमध्ये जागरूकता नसल्याबद्दल अनेक युजर्सनी कमेंट केली आहे. तसेच काहींनी शहरांमधील रेल्वे ट्रॅकवरून लोकांना चालण्यापासून रोखण्यासाठी तसंच रेल्वे ब्रिज सहज ओलांडता येईल, यासाठी गार्ड रेल असावेत, असाही सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ 20 मे 22 चा असून त्या रुळावर धावणाऱ्या मुलांवर कारवाई झाली की नाही, याबद्दल काही माहिती देण्यात आली नाही.