नवी दिल्ली 11 जुलै: प्रेम (Love) हे आंधळं असतं. ते कधीच वेळ, काळ, चेहरा आणि परिस्थिती पाहून होत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, आता याच वाक्याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणीचं कैद्यावर प्रेम (Woman Fell in Love With Prisoner) जडलं. विशेष म्हणजे चार जणांची गोळ्या झाडून हत्या (Murder) करणाऱ्या या आरोपीसोबत लग्न (Marriage) करण्याचा निर्णय या तरुणीनं घेतला आहे. या कैद्याला वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, तरीही ही तरुणी तुरुंगात जाऊन त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. 5 मुलींची आई 30 वर्षाच्या तरुणासोबत करत होती पाचवं लग्न, मुलीला समजलं आणि… कॅली जेकब असं या डच तरुणीचं नाव आहे. ती जेम्स डेंटर नावाच्या आरोपीच्या प्रेमात पडली आहे. विशेष बाब म्हणजे ती आणि जेम्स आतापर्यंत कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत. या दोघांच्या प्रेम कहाणीला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. कॅली एका कंपनीत इंटर्न म्हणून काम करत होती. WRITEAPRISONER.COM या वेबसाईटसाठी ती काम करत होती. यातून ती कैद्यांची कैफीयत मांडायची. याचसाठी कॅलीनं जेम्ससोबत ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधला. हळूहळू लेटर आणि नंतर एकमेकांसोबतचं फोनवरचं बोलणंही वाढलं. पुढे त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पतीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काही दिवसात झाला खुलासा अन्.. जेम्सनं काही काळानंतर कॅलीला लग्नासाठी मागणी घातली. 2032 पर्यंत जेम्स तुरुंगातच राहाणार आहे, याची कल्पना असूनही कॅलीनं या लग्नास होकार दिला. कॅली एका कैद्यासोबत लग्न करणार आहे, हे समजताच तिच्या घरच्यांना धक्का बसला. मात्र, कॅलीनं आपल्या आई-वडीलांचं जेम्ससोबत बोलणं करून दिलं आणि तेदेखील या लग्नास तयार झाले. आता दोघंही तुरुंगातच लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नानंतर दहा वर्ष ते एकमेकांपासून दूर राहणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.