जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पतीच्या खास मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काहीच दिवसात झाला खुलासा अन्...

पतीच्या खास मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काहीच दिवसात झाला खुलासा अन्...

पतीच्या खास मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काहीच दिवसात झाला खुलासा अन्...

कॅटीनं सांगितलं, की तिला समलैंगिक संबंधांमध्ये अधिक रस आहे. यानंतर तिनं आपल्याच पतीची मैत्रीण असलेल्या क्लेयरबद्दल जस्टिनला सांगितलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जुलै: पती आणि पत्नीच्या (Husband and Wife) नात्यात तिसऱ्याच व्यक्तीची एन्ट्री झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र आता समोर आलेलं प्रकरण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. या घटनेत आपल्या पत्नीला महिलांमध्येही रस असल्याचं (Bisexuality) लक्षात येताच लग्नानंतर पतीनं आपली प्रेयसी पत्नीला गिफ्ट (Gift) म्हणून दिली. त्याची पत्नी ज्या मुलीवर प्रेम करत होती, तिला तो घरी घेऊन आला (Love Triangle). यानंतर तिघेही एकत्र राहू लागले. सध्या त्यांचं आयुष्य कसं सुरू आहे, याबाबत त्यांनी हैराण करणारी माहिती दिली. यूएसच्या या कपलच्या प्रेमाची सुरुवात कॉलेजमधून (College) झाली होती. पती जस्टिन हा एक कॉमेडियन (Comedian) आहे. त्यानं सांगितलं, की 2006 मध्ये एका कॉमेडी शोच्या वेळी त्याची भेट रिअल इस्टेट असोशिएट कॅटी रुपल हिच्यासोबत झाली. हळूहळू हे नातं प्रेमात बदललं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. 2013 साली कॅटी आणि जस्टिननं लग्नगाठ बांधली. असं म्हणतात की लग्नानंतर नवरा बायकोमध्ये सिक्रेट असं काहीच राहात नाही. अशाच एका सिक्रेटबद्दल कॅटीनं आपल्या पतीला सांगितलं, तेव्हा तो हैराण झाला. Video: मुलीनं केली आईची नक्कल; Work From Home करत घातला इंटरनेटवर धुमाकूळ कॅटीनं सांगितलं, की तिला समलैंगिक संबंधांमध्ये अधिक रस आहे. यानंतर तिनं आपल्याच पतीची मैत्रीण असलेल्या क्लेयरबद्दल जस्टिनला सांगितलं. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर क्लेयरला पाहिलं होतं आणि तिच्याकडे आकर्षित झाली होती. जस्टिननं सांगितलं, की 36 वर्षीय क्लेयर थोर्नहिल त्याची कॉलेजमधील मैत्रीण आहे. जेव्हा त्याला समजलं की त्याची पत्नी क्लेयरवर प्रेम करते तेव्हा त्यानं आपल्या पत्नीसोबत मिळून क्लेयरला याबाबत माहिती दिली. क्लेयरनं म्हटलं, की जेव्हा जस्टिन आणि त्याची पत्नी कॅटी याबाबत तिला सांगितलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, तिलाही आधीपासूनच मुलं आणि मुली दोघांमध्येही रस असल्यानं ती कॅटीसोबत राहण्यास तयार झाली. तिघांचंही म्हणणं आहे, की अशाप्रकारचं नातं सांभाळण्यासाठी योग्य संवाद आणि टीम वर्क गरजेचं आहे. त्यांच्यातील कोणालाही एखादी गोष्ट खटकली तर ते सर्व सोबत बसून यातून मार्ग काढतात. “बीजेपी विधायक ने मुझे थप्पड़ मारा”, यूपी पोलीस अधिकाऱ्याचा Viral Video त्यांच्या या निर्णयाला घरच्यांचाही विरोध नाही. मात्र, अनेकांनी त्यांना ऑनलाईन ट्रोल केलं आहे. क्लेयरचं म्हणणं आहे, की एका माणसाच्या रुपात आपण एकसोबतच अनेक लोकांवर प्रेम करण्यास सक्षम आहोत आणि एकमेकांसोबत राहाण्याची संधी आम्हाला मिळतीये यासाठी आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. ती म्हणाली, की कोणावर प्रेम करताना कधीही लाज बाळगू नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात