जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हद्द झाली! 5 मुलींची आई 30 वर्षाच्या तरुणासोबत करत होती पाचवं लग्न, मुलीला समजलं आणि...

हद्द झाली! 5 मुलींची आई 30 वर्षाच्या तरुणासोबत करत होती पाचवं लग्न, मुलीला समजलं आणि...

हद्द झाली! 5 मुलींची आई 30 वर्षाच्या तरुणासोबत करत होती पाचवं लग्न, मुलीला समजलं आणि...

45 वर्षांच्या महिलेनं 30 वर्षांच्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या महिलेला 5 मुली असून तिचं हे पाचवं लग्न होणार (Mother of Five Daughter doing fifth marriage) होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 11 जुलै: लग्नाच्या संदर्भातल्या एका अजब प्रकरणाचा गुंता कसा सोडवायचा असा प्रश्न सध्या पोलिसांना पडला आहे. या प्रकरणात एका 45 वर्षांच्या महिलेनं 30 वर्षांच्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या महिलेला 5 मुली असून तिचं हे पाचवं लग्न होणार (Mother of Five Daughter doing fifth marriage) होतं. मुलीला आणि जावायाला या लग्नाची माहिती समजताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या विषयावर दोन्ही पक्षांनी परस्पर विरोधी दावे केल्यानं हा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. काय आहे प्रकरण? मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)  भिंड येथील हे प्रकरण आहे. या प्रकरणात एक 45 वर्षांत्या महिलेच्या विरोधात तिच्या मुलीनं आणि जावायनं शनिवारी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की ते समजल्यानंतर पोलीसही काही काळ चक्रावले. या महिलेला तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान म्हणजेच 30 वर्षाच्या तरुणाशी पाचवं लग्न करायचं आहे. तिची यापूर्वी चार लग्न झाली आहेत. यापैकी पहिल्या नवऱ्याने तिला सोडून दिले.  त्यानंतरच्या दोन नवऱ्यांचा मृत्यू झाला.  या महिलेनं चौथं लग्न केलं, ते देखील फार काळ टिकले नाही. या सर्व अनुभवानंतर ही महिला सध्या 30 वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. गेल्या 1 महिन्यांपासून ते दोघं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. या महिलेच्या मुलींचा खर्चही हा तरुणच करत असल्याची माहिती आहे. तिच्या पाच पैकी दोन मुलींचे लग्नं झाली आहेत. आपली आई पाचवं लग्न करणार असल्याचं समजताच त्यांनी त्यांच्या पतीसह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत हे लग्न थांबवण्याची मागणी केली. पतीच्या खास मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काहीच दिवसात झाला खुलासा अन्… काय आहे महिलेचा दावा? मुलींच्या तक्रारीनंतरही ही महिला लग्न करण्यावर ठाम आहे. आपण मुलींना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहोत. ती शिस्त सहन न झाल्यामुळेच त्यांनी ही तक्रार केली आहे. आपण पाचवं लग्न हे मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी करत आहोत, असा दावा या महिलेनं केला आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांमध्ये परस्पर सहमतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात