मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आधी तिला चक्कर येते, नंतर घरात कुठेही लागते आग; विचित्र घटनेमुळे कुटुंबासह भयभीत झालं अख्खं गाव

आधी तिला चक्कर येते, नंतर घरात कुठेही लागते आग; विचित्र घटनेमुळे कुटुंबासह भयभीत झालं अख्खं गाव

महिलेला चक्कर आल्यानंतर घऱात लागते आग. (प्रतीकात्मक फोटो)

महिलेला चक्कर आल्यानंतर घऱात लागते आग. (प्रतीकात्मक फोटो)

महिलेला चक्कर आल्यानंतर कारणाशिवाय लागल्या या आगीच्या विचित्र घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Priya Lad

पाटणा, 16 नोव्हेंबर : काही घटना अशा असतात ज्याच्यामागील कारण सांगणं अशक्य असतं. त्या का घडतात ते सांगू शकत नाही. किंबहुना त्यावर कुणी विश्वासही ठेवत नाही. अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे. एका महिलेला आधी चक्कर येते आणि नंतर तिच्या घरात कुठेही आग लागते. बिहारमधील ही विचित्र घटना आहे. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबासह अख्खं गाव भयभीत झालं आहे. चक्कर आणि आगीमागे नेमकं काय कनेक्शन आहे, हे रहस्य बनून राहिलं आहे.

आग लागण्याची वेगवेगळी कारणे आहेत पण कधी कुणाला चक्कर आल्यानंतर आग लागल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पूर्णिया जिल्ह्यातील गंगेलीगावातील यादव कुटुंब. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात ही विचित्र घटना घडत आहे. घरातील मोठ्या सुनेला चक्कर येते आणि त्यानंतर घरात कुठेही अचानक आग लागते. आग विझवल्यानंतर महिला हळूहळू शुद्धीवर येते. आग लागण्याचं नेमकं कारण काय हे कुणालाच माहिती नाही.

हे वाचा - निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! दंडवत घातलं तो पुन्हा उठलाच नाही, मंदिरात दर्शन घेताच गेले प्राण

ज्या महिलेला चक्कर येते तिचं नाव आरती देवी आहे. ती म्हणाली, आग लागण्याआधी मला विचित्र वाटू लागतं. अचानक तब्येत बिघडल्यासारखं वाटतं. आग विझवल्यानंतर मी बेशुद्ध होते. याआधी माझ्यासोबत असं कधीच झालं नाही.

कुटुंबातील रघुनंदन यादव यांनी सांगितलं हे  शनिवारपासून हे सुरू झालं आहे.  सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान कधीही अचानक आग लागते. आग घराच्या वेगवेगळ्या भागात लागते.  आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी ग्रामस्थही मदतीला येतात. आग विझवल्यानंतर घरातील मोठी सून बेशुद्ध होते. पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणलं जातं.

हे वाचा - आमदाराने उडत्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करताच म्हशीचा मृत्यू; मालकाचा दावा, पोलिसात तक्रार

गेल्या तीन-चार दिवसांपासून असंच सुरू आहे. यामुळे कुटुंबासह गावातील लोकही घाबरले आहेत. कुटुंब आणि ग्रामस्थांना हा जादूटोण्याचा प्रकार असावा असं वाटतं आहे. त्यामुळे घरात आता पंडितांना बोलावून पूजा करवून घेतली जाते आहे.

First published:

Tags: Bihar, Fire, Viral, Viral news