अजमेर, 15 नोव्हेंबर : पोलीस ठाण्यात भांडणं, चोरी, हत्या अशा गुन्ह्यांची तक्रार होते. पण काही तक्रारी इतक्या अजब असतात की आपण विचारही करू शकत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. आमदाराने उडत्य हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षावर करतात म्हशीचा मृत्यू झाला, असा दावा एका शेतकऱ्याने केला आहे. त्याने याबाबत पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल केला आणि भरपाईची मागणी केली. राजस्थानमधील हे प्रकरण आहे. अलवर जिल्ह्यातील बहरोडमधील आमदार बलजीत यादव यांच्या कार्यकाळाला 4 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी समर्थकांचे आभार मानण्यासाठी धन्यवाद यात्रा काढली. आकाशात उडत्या हेलिकॉप्टरमधून त्यांनी नागरिकांवर फुलांचा वर्षाव केला. पण हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करत जनतेचे आभार माननं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. हे वाचा - निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! दंडवत घातलं तो पुन्हा उठलाच नाही, मंदिरात दर्शन घेताच गेले प्राण कोहरना गावातील बलबीर सिंह नावाच्या शेतकऱ्याने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यांच्या हेलिकॉप्टरमुळे त्यांच्या घरात बांधलेल्या म्हशीचा मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला आहे. बलबीर सिंहने पत्र लिहिलं आहे, हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पत्रात त्यांनी म्हटल्यानुसार, 13 नोव्हेंबरला बहरोड विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये आमदाराचं हेलिकॉप्टर पुष्पवर्षावर केला. हेलिकॉप्टर जमिनीहून फक्त 20 मीटर उंचावर उडत होतं. जेव्हा ते बलबीरच्या घराच्या वरून गेलं तेव्हा त्याच्या घरात बांधलेल्या म्हशीचा हेलिकॉप्टरचा मोठा आवाज ऐकून घाबरली आणि खाली कोसळली. जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला. ही म्हैसच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन होती. तिची किंंमत दीड लाख रुपये होती. आमदाराच्या हेलिकॉप्टरच्या पायलटच्या बेजबाबदारपणामुळे म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्याने केली. हे वाचा - जंगलाच्या राजाचीही काय हिंमत की माणसांवर हल्ला करेल; तरुणाने सिंहापासून कसा वाचवला स्वत:चा जीव पाहा VIDEO या प्रकरणाचा तपास सुरू आहे. म्हशीचा पोस्टमॉर्टेम केलं जात आहे. रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.