भोपाळ, 14 नोव्हेंबर : मृत्यू कधी, कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. अगदी हसता-बोलता, चालता-फिरता मृत्यू झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती. अगदी आज ठणठणीत दिसणारा व्यक्ती काही क्षणात या जगातून कायमचा निरोप घेतो. ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. अशीच एक मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा मंदिरात लोटांगण घालताच देवासमोरच जीव गेला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील ही धक्कादायक घटना आहे. गुडगावातील 60 वर्षांचे सतीश मूलचंद शनिवारी आपल्या कुटुंबासह उज्जैनच्या महाकाल मंदिरात संध्याकाळी दर्शनासाठी आले. कुटुंबासोबत त्यांनी संध्या आरती केली आणि त्यानंतर शयन आरतीत सहभागी झाले. आरतीनंतर त्यांनी महाकालासमोर लोटांगण घातलं. देवासमोर ते नतमस्तक झाले. हे वाचा - नशीब म्हणतात ते हेच का? भरधाव कार येताच… हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात कॅमेरात कैद तुम्ही पाहिलं असेल की मंदिरात बरेच लोक दंडवत घालून किंवा नतमस्तक होऊन देवाचे आशीर्वाद घेतात. तुम्हीसुद्धा असं करत असाल. सतीशसुद्धा अशीच देवाची प्रार्थना करत होते. पण बराच वेळ त्याच मुद्रेत होते. सुरुवातीला सर्वांना ते अजून प्रार्थना करत आहेत असं वाटलं. पण बराच वेळ ते तसेच होते, बिलकुल हलले नाहीत. त्यांच्या शरीरात काहीच हालचाल दिसत नव्हती. म्हणून त्यांच्या कुटुंबाने त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. हे वाचा - अजब योगायोग! 11-11-2011 रोजी 11 वाजून 11 मिनिटांनी जन्म; आता 11 व्या वाढदिवशी… महाकाल मंदिर समितीच्या अॅम्ब्युलन्समार्फत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. एशियानेट हिंदीच्या रिपोर्टनुसार उज्जैन पोलिसांनी सांगितलं की नंदी हॉलेबाहेर दर्शन करताना सतीश यांचा जीव देला. रविवारी पोस्टमॉर्टेमनंतर त्यांचा मृतदेह नागरिकांना सोपवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.