मराठी बातम्या /बातम्या /Viral /चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा गेला तोल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा गेला तोल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

एका महिलेनं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. महिलेचा हा प्रयत्न अपयशी ठरलाच मात्र सोबतच ती ट्रेनमधून खाली कोसळली (Woman Falls off Moving Train).

एका महिलेनं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. महिलेचा हा प्रयत्न अपयशी ठरलाच मात्र सोबतच ती ट्रेनमधून खाली कोसळली (Woman Falls off Moving Train).

एका महिलेनं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. महिलेचा हा प्रयत्न अपयशी ठरलाच मात्र सोबतच ती ट्रेनमधून खाली कोसळली (Woman Falls off Moving Train).

भोपाळ 11 जुलै : एक हैराण करणारा व्हिडिओ (Shocking Video Viral) नुकताच समोर आला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून सगळे हेच म्हणत आहेत, की देव तारी त्याला कोण मारी. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळ रेल्वे स्टेशनवरील (Bhopal Railway Station) आहे. यात दिसतं की एका महिलेनं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. महिलेचा हा प्रयत्न अपयशी ठरलाच मात्र सोबतच ती ट्रेनमधून खाली कोसळली (Woman Falls off Moving Train). ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.

महिलेने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; आत्महत्येचा Video CCTV कॅमेऱ्यात कैद

चालत्या ट्रेनमध्ये चढत असतानाच एका महिला प्रवाशाचा पाय घसरला. यानंतर ही महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच आडकली. मात्र, मध्य प्रदेश पोलिसांतील विनोद बघेल यांनी तत्परता दाखवत महिलेला बाहेर ओढलं आणि तिचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हेड कॉन्स्टेबल विनोद बघेल यांनी सांगितलं, की त्यांच्या समोरच ही घटना घडली आणि त्यांनी थोडाही उशीर न करता महिलेला ट्रेनपासून दूर केलं. काहीच वेळात तिच्या कुटुबीयांना स्टेशनवर उभा असलेले इतर लोक तिच्याजवळ घेऊन आले. घटनेनंतर महिलेला मोठा धक्का बसला होता मात्र ती सुरक्षित आहे.

OMG! नवविवाहितांना 3 दिवस टॉयलेटला बंदी; 'या' देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा

चालत्या ट्रेनमध्ये चढताना घडलेली ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता पोलीस आणि रेल्वेचे जवान स्टेशनवर उपस्थित असतात त्यामुळे अनेकदा या दुर्घटना टळतात. नुकतंच प्रयागराज स्टेशनवरील एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. स्टेशनवर ट्रेन पोहचताच हा व्यक्ती चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तोल गेला आणि तो ट्रेनमधून खाली कोसळला. यादरम्यान त्याठिकाणी असलेल्या RPF जवानानं त्यांचा जीव वाचवला होता.

First published:

Tags: Railway accident, Railway track accident, Shocking video viral