मराठी बातम्या /बातम्या /Viral /65 वर्षांच्या महिलेने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; आत्महत्येचा Live Video CCTV कॅमेऱ्यात कैद

65 वर्षांच्या महिलेने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; आत्महत्येचा Live Video CCTV कॅमेऱ्यात कैद

महिला अगदी सहजपणे 7 व्या मजल्यावर गेली, खाली वाकून पाहिलं तर उंचीची भीती वाटली म्हणून तिने भिंतीकडे तोंड केलं आणि स्वत:ला झोकून दिलं.

महिला अगदी सहजपणे 7 व्या मजल्यावर गेली, खाली वाकून पाहिलं तर उंचीची भीती वाटली म्हणून तिने भिंतीकडे तोंड केलं आणि स्वत:ला झोकून दिलं.

महिला अगदी सहजपणे 7 व्या मजल्यावर गेली, खाली वाकून पाहिलं तर उंचीची भीती वाटली म्हणून तिने भिंतीकडे तोंड केलं आणि स्वत:ला झोकून दिलं.

गांधीनगर, 10 जुलै : गुजरातमधील (Gujrat) राजकोटमध्ये शनिवारी सकाळी 65 वर्षीय महिलेने आपल्या अपार्टमेंटच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Woman Suicide) केली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड करणाऱ्या जमनाबेन सोलंकी बराच काळापासून मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (A 65 year old woman committed suicide by jumping from the 7th floor of her apartment in gujrat)

जमनाबेन यांच्या आत्महत्येची घटना अपार्टमेंटमध्ये लावलेल्या CCTV मध्ये कैद (CCTV Camera) झाली आहे. तुम्ही पाहू शकता की, जमनाबेन पायऱ्या चढून सातव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. (Suicide Captured on CCTV camera) यावेळी दोन महिला गॅलरीचा परिसर स्वच्छ करीत होत्या. काहीही न बोलता त्या अगदी सहजपणे 7 व्या मजल्याच्या गॅलरीजवळ पोहोचल्या. सुरुवातील महिलेने खाली वाकून पाहिलं. त्यानंतर त्या बाऊंड्री वॉलवर चढल्या. आणि तेथून स्वत:ला झोकून दिलं. व्हिडीओ पाहून असा कयास लावला जात आहे की, उंचावर गेल्या कारणाने त्या घाबरल्या असाव्यात. आणि म्हणूनच त्यांनी भिंतीच्या दिशेने चेहऱा केला आणि उडी मारली.

हे ही वाचा-हत्येसाठी गुगल मॅपची घेतली मदत; लग्नाच्या अवघ्या 15 दिवसात तरुणीने पतीला संपवलं

जमनाबेनचं सधन कुटुंब

राजकोटच्या कुवाडवा रोडवरील क्रिस्टल कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जमनाबेन सोलंकी सुखी-संपन्न कुटुंबातील आहेत. कुुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. उपचारानंतरही त्यांचा परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे त्या खूप त्रस्त होत्या. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Cctv footage, Crime news, Gujrat, Suicide